Ajit Pawar News: राष्ट्रवादीच्या कार्यक्रम पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब, कारण अस्पष्ट

Ajit Pawar News : राष्ट्रवादीच्या वतीने 'कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv
Published On

Political News : राष्ट्रवादीत अजूनही काहीतरीधुसपूस सुरु आहे, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपसोबत जाणार असल्याच्या अफवांवर स्वत: अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. मात्र राष्ट्रवादीत अजूनही काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचं मुंबईत होणार शिबीर यावेळी निमित्त ठरलं आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने 'ध्येय राष्ट्रवादीचे... मुंबई विकासाचे...' या शिर्षकाखाली 'कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र या शिबीर पत्रकात अजित पवारांच नावं नाही. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीर यांच्या अध्यक्षतेखाली ही शिबीर पार पडणार आहे. (Latest News Update)

Ajit Pawar
Heat Wave News: वाढती उष्णता बनली जीवघेणी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

सोहबतच खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, अनिल देशमुख यांचं नाव देखील शिबीर पत्रिकेत आहे. शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २००० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवार या शिबीरात उपस्थित राहणार की नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे. (Political News)

Ajit Pawar
kharghar heat stroke News: 'खारघर दुर्घटनेची न्यायालयीन ‌चौकशी करावी...' विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी

शिबीरात चर्चीले जाणारे विषय

सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिलांची असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बँक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रूप दडवणे, नागरी सुविधा प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशा व इतर विविध मुद्यांवर या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरामध्ये चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांचं नाव नाही असं तुम्ही सांगत आहेत. मात्र त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यात हस्तक्षेप करणे योग्य नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com