Maggi Saam Tv
देश विदेश

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; मॅगी, चहासह ‘ह्या’ वस्तू महागल्या

मॅगीच्या दरात ९ ते १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - वाढत्या महागाईत आधीच वैतागलेल्या जनतेला आणखी एक मोठा झटका बसणार आहे कारण मॅगी आणि चहासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्ले यांनी त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार चहा, कॉफी, दूध आणि मॅगीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

हे देखील पहा -

हिंदुस्तान युनिलिव्हरने ब्रू कॉफीच्या दरात ३-७ टक्के आणि ब्रू गोल्ड कॉफीच्या दरात ३-४ टक्क्यांनी वाढ केली आहे. इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीदेखील ३ वरून ६.६६ टक्के वाढल्या आहेत. याशिवाय ताजमहाल चहाची किंमत ३.७ टक्के वरून ५.८ टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या सर्व प्रकारच्या चहाच्या किंमतीत १.५ टक्क्यांवरून १४ टक्के वाढ करण्यात आली आहे.

तर मॅगीच्या दरात ९ ते १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या किंमतीनंतर मॅगीच्या ७० ग्रॅमच्या पॅकसाठी १२ रुपयांऐवजी आता १४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १४० ग्रॅम मॅगी साठी आता 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. यापूर्वी ५६० ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी ९६ रुपये मोजावे लागत होते, मात्र यासाठी आता १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

नेस्लेने एक लिटर A+ दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी यासाठी ७५ रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी आता ७८ रुपये मोजावे लागणार आहेत. नेस्कॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या दरात ३ ते ७ टक्क्यांची वाढ केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Famous Actress Death: मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

CPR During Heart Attack: हार्ट अटॅक आला की सीपीआर कधी द्यायचा? जीव वाचवण्यासाठी योग्य मार्ग लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT