Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : लिफ्टच्या बटनांवर लघुशंका करणे पडले महागात; तरुणासोबत पुढे काय घडलं?

एका तरुणाने चक्क लिफ्टमध्ये बटनांवर लघुशंका केली आहे.

Ruchika Jadhav

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी प्रकार पाहायला मिळतात. यात काही स्टंटचे व्हिडिओ काळजात धडकी भरवतात तर काही ठिकाणी त्यांचीच स्टंटबाजी त्यांच्या अंगावर उलट फिरते आणि पाहणाऱ्याला हसू आवरत नाही. आपण जे काही पेरतो तेच उगवतं, जसे कर्म तसे फळ याची प्रचिती अनेक वेळा आली आहे. (Latest Viral Video)

काही दिवसांपूर्वी एका विमानात प्रवाशाने दारूच्या नशेत वृध्द महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. ही घटना ताजी असतानाच आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने चक्क लिफ्टमध्ये बटनांवर लघुशंका केली आहे. लिफ्टमध्ये असलेल्या कॅमेऱ्यात त्याचा व्हिडिओ देखील कैद झाला आहे. आता केलेल्या चुकीचं फळ तर मिळणारच.

तरुणाने असे केल्यावर लिफ्टची बटणे खराब होतात. लिफ्ट पोहचल्यावर त्याचे दार उघडतचं नाही. त्यामुळे तरुण थोडा भांबावतो. तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागतो. लिफ्टची बटणे दाबून पुन्हा लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करतो. मात्र यात लिफ्ट शॉर्टसर्किट होऊन बंद पडते आणि पूर्ण अंधार होतो. तसेच लिफ्टमध्ये ठिणग्या बाहेर पडताना दिसतात.

लिस्टमध्ये (Lift) तरुणाने केलेला हा प्रकार आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. नेटकरी त्याला पाहून चांगली अद्दल घडली असे म्हणत आहेत. आता पर्यंत या व्हिडिओला लाखो व्यूव्ज मिळाले आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं आहे की, त्याने देखील दारूच्या नशेत असं कृत्य केलं असेल. तर आणखीन एकाने तो आतमध्येच अडकून रहायला पाहिजे असे म्हटले आहे. तर अनेक जण तरुणाच्या या फजितीवर लोटपोट हसतं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT