नवी दिल्ली : देशात कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरायच्या अगोदरच तिसऱ्या लाटेचे चित्र उभे राहिले आहे. ३ लाखांच्या पुढे, आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता कुठे ५० हजारांच्या घरात आली आहे. यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसियशनने Indian Medical Association सांगितलेल्या एका इशाऱ्यामुळे ही चिंता वाढली जाणार आहे. The third wave of corona is coming
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार हे ठरवलेच आहे, ते लवकरच येईल. यामुळे केंद्र Center आणि राज्य State सरकारांनी इतक्यात लगेच कोरोना निर्बंधामध्ये सूट देऊ नये, अशा इशारा इंडियन मेडिकल असोसियशनने दिले आहे. एएनआयने ANI यासंदर्भा मधील वृत्त दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट येणे हे अटळ ठरले आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण Vaccination करणे आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन आवश्यक ठरणार आहेत.
हे देखील पहा-
हे केल्यानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येणार आहे, असे आयएमएने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. जागतिक पुरावे आणि महामारीचा इतिहास बघता तिसरी लाट लवकरच येणार आहे. पण, आता आपल्या पाठीशी २ लाटेना हाताळण्याचे अनुभव आहे, असेही आयएमएने सांगितले आहे. जवळपास दीड वर्षांपासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. The third wave of corona is coming
जगाने कोरोना विषाणूच्या २ लाटा बघितल्या आहेत. आता ३ लाटेची वाट बघत आहेत. ती येणार हे अनिवार्य आहे. पण, मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला लस देऊन, व कोरोना निर्बंधांचे पालन करुन, आपल्याला तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येणार आहे. याकरिता सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता लागणार आहे, असे रिपोर्टमध्ये म्हणले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार व लोकांनी तिसऱ्या लाटेचे गांभीर्य घेणे आवश्यक ठरले आहे. लोकांनी गर्दी करणे टाळावे, पर्यटन, धार्मिक उत्सव असे काही कार्यक्रम आवश्यक असले, तरी देखील ते काही महिने पुढे ढकलावे. धार्मिक उत्सवांना परवानगी दिल्याने, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र होतील, असे कार्यक्रम कोरोनाचे सुपरस्प्रेडर इव्हेंट ठरु शकत आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिल्यासारखे होईल, असे आयएमएने सांगितले आहे. सरकारने आणखी ३ महिने कोरोना निर्बंधाचे कडक व काटेकोरपणे पालन करावे, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी, असा सल्ला यावेळी देण्यात आले आहे. The third wave of corona is coming
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.