जगाची चिंता वाढली; तालिबान्यांच्या हाती लागली युद्ध सामग्री Saam Tv
देश विदेश

जगाची चिंता वाढली; तालिबान्यांच्या हाती लागली युद्ध सामग्री

नवीन अटॅक हेलिकॉप्टर देखील आहेत, जी केवळ एक महिन्यापूर्वीच अफगाणिस्तानला पाठवण्यात आली होती.

वृत्तसंस्था

अमेरिका (USA) आणि उर्वरित जगाची मोठी अडचण वाढली आहे. कारण अफगाणिस्तानमधील (Afganistan) युद्ध सामग्री आता तालिबान्यांच्या (Talibani) हाती लागली आहे. आणि ती सामग्री तालिबान्यांनी लगेच आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यात सात नवीन अटॅक हेलिकॉप्टर देखील आहेत जी केवळ एक महिन्यापूर्वीच अफगाणिस्तानला पाठवण्यात आली होती. ही हेलिकॉप्टर तालिबानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अफगाण हवाई दल वापरणार होती. याशिवाय, ती सर्व अत्याधुनिक शस्त्रे आणि वाहने देखील तालिबानच्या हातात आहेत जी अमेरिकेने अफगाण सैन्याला दिली होती.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांनी म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात गमावलेली ही शस्त्रे परत मिळतील अशी आशा नाही. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी अवघ्या दोन-तीन आठवड्यांत देशाचा बहुतांश भाग काबीज केला. यामध्ये राजधानी काबुल, कंधार, हेरात, मजार-ए-शरीफ, लष्करगाह आणि बहुतेक प्रांतीय राजधान्यांचा समावेश आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारी सैनिक लढाई न करता पळून गेले, शस्त्रे सोडून शरण गेले. परिणामी, त्यांची शस्त्रे मोठ्या प्रमाणात तालिबानच्या हातात लागली. तालिबानला अमेरिका आणि भारताकडून पाठवण्यात आलेले लढाऊ हेलिकॉप्टर आणि मध्यम श्रेणीची विमानेही मिळाली आहेत.

एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तालिबानी लढाऊ नवीन शस्त्रे, दळणवळणाची उपकरणे, नाईट व्हिजन यंत्रे आणि मोठ्या प्रमाणात सापडल्याने आनंदीत होत आहेत. त्यांना हा खजिना पाहून आश्चर्य वाटत आहे. त्यांना अपेक्षा नव्हती की त्यांना इतक्या लवकर विजय मिळेल आणि किरकोळ लढाईनंतर त्यांना एवढे संसाधन मिळतील. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानला अफगाण हवाई दलाची 40 आधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टर आणि ड्रोन मिळाले आहेत. या व्यतिरिक्त, तालिबानला दोन हजार बख्तरबंद वाहने देखील मिळाली आहेत, ज्यात बख्तरबंद हुम्वी वाहनांचा समावेश आहे.

जे सर्व प्रकारच्या हल्ल्यापासून बचाव करण्यास सक्षम आहेत. तालिबानच्या हातात इतकी अत्याधुनिक लष्करी उपकरणे आणि शस्त्रे गमावल्याबद्दल अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे. असे म्हटले गेले आहे की आता तालिबानशी सामना करणे अधिक कठीण होणार आहे. साहजिकच या शस्त्रांचा वापर निरपराध नागरिकांना मारण्यासाठी केला जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT