Three Fall from Mid-air After Parachute Takes Turn During Parasailing in Daman
Three Fall from Mid-air After Parachute Takes Turn During Parasailing in Daman Saam Tv News
देश विदेश

Video: पॅरासेलिंग करताना दोरीच तुटली; पॅराशूट हवेत असतानाच तिघे खाली कोसळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दमण: पॅरासेलिंग (Parasailing) पॅराग्लायडिंग हे खेळ प्रचंड उत्साह भरवणारे असले तरी यामध्ये रिस्कही तेवढीच आहे. जर योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. दमणमध्ये पॅरासेलिंग दरम्यान पॅराशूटने अचानक टर्न घेतल्यानंतर भर हवेतून तीन जण खाली पडून गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. (Three Fall from Mid-air After Parachute Takes Turn During Parasailing in Daman; Injured)

हे देखील पाहा -

व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, ज्यामध्ये तीन लोक टेकऑफ झाल्यानंतर लगेचच खाली पडताना दिसत आहेत. पॅराशूटची दोरी एका बाजूने निघून गेल्याचे व्हिडिओत दिसतेय. दमणमधील (Daman) झंपूर बीचवरील (jampore beach) हा व्हिडिओ आहे.

जवळपास ३० सेकंदांच्या या हृदयद्रावक फुटेजमध्ये तिघे जण पॅराशूटने हवेत टेक ऑफ करतात आणि काही सेकंदातच पॅराशूट हवेत एक वळण घेते त्यानंतर तिघे जण जमिनीवर पडतात. यामुळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्येही, दीव येथे अशीच एक घटना घडली होती. यात पॅरासेलिंग दरम्यान एक जोडपे पॅराशूटच्या साहाय्याने परासेलिंग करत असताना अचानक त्यांच्या पॅराशूटची दोरी अचानक तुटली. खाली समुद्र असल्याने हे जोडपे समुद्रात पडले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दोघेही दुखापत न होता बचावले होते. मात्र यंदा तीन जण हे हवेतून जमीनीवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Viral Video:'बॅटने मारेल..' लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला - Video

Today's Marathi News Live : वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरातील पूजेवरून पुन्हा वाद, महेश महाराज यांना मारहाण

Maharashra Politics : राज्यात ४ जूननंतर मोठा राजकीय भूकंप होणार; भाजप पदाधिकाऱ्याने केला मोठा दावा

Raigad Rain: मुंबई-गोवा महामार्गाला वादळाचा फटका, झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Swati Maliwal Assault Case: महिला आयोगाच्या समन्सनंतर स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाच्या तपासाला वेग

SCROLL FOR NEXT