global hunger index india saam tv
देश विदेश

Global Hunger Index 2024: देशात अजूनही भुकेचा प्रश्न 'गंभीर'; 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर

Global Hunger Index 2024: 19 व्या ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर असल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देशभरात कुपोषणाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. अशातच नुकताच हाती आलेला ग्लोबल हंगर इंडेक्सच्या रिपोर्टची आकडेवारी हादरवून टाकणारी आहे. संपूर्ण देशातील तब्बल ८० कोटी जनतेला ५ किलो धान्य मोफत दिलं जात असूनही लाखो लोकांची उपासमार होत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

यंदाच्या ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 च्या यादीत 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 125 देशांपैकी 111 व्या आणि 2022 मध्ये 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर होता.

गेल्या वर्षाच्या तुलनेत सुधारणा

गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा भारताच्या क्रमवारीत सुधारणा झालीये. मात्र भारत अजूनही भुकेची 'गंभीर' समस्या असलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये मोडला जातो. भारताचे निर्देंशाक स्कोर शेजारी श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशच्या मागे आहे. श्रीलंका ५६व्या, नेपाळ ६८व्या आणि बांगलादेश ८४व्या क्रमांकावर भारतापेक्षा खूप पुढे आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची स्थिती आपल्यापेक्षा वाईट आहे.

Concern Worldwide आणि Welthungerhilfe यांनी संयुक्तपणे हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल जगभरातील भुकेच्या महामारीची माहिती घेतो. खासकरून ज्या ठिकाणी तातडीच्या कारवाईची गरज आहे अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येतं.

काय आहे भारताचा निर्देशांक स्कोर

2024 च्या या रिपोर्टमध्ये भारताचा स्कोअर 27.3 आहे. जो भूकची गंभीर स्थिती दर्शवतो. या रिपोर्टमध्ये गेल्या काही वर्षांत भारतात कुपोषणाच्या प्रमाणात किंचित वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलंय. भारताचा 2024 स्कोअर 2016 च्या GHI स्कोअर 29.3 पेक्षा काही सुधारणा दर्शवतोय. 2016 मध्येही भारत 'गंभीर' श्रेणीतच होता. 2000 आणि 2008 मधील अनुक्रमे 38.4 आणि 35.2 च्या स्कोअरच्या तुलनेत ही लक्षणीय प्रगती आहे.

भारतामध्ये कुपोषणाची परिस्थिती अजूनही गंभीर

भारताला अजूनही बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर आव्हानांचा सामना करावा लागतोय. ज्यात जागतिक स्तरावर सर्वाधिक चाईल्ड वेस्टिंग प्रमाण (18.7%) आहे. देशात मुलांची वाढ होण्याचे प्रमाण 35.5% आहे तर 5 वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर 2.9% आणि कुपोषण दर 13.7% असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

SCROLL FOR NEXT