Omicron Variant ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक; रिपोर्टमध्ये काय म्हटलंय? Saam Tv
देश विदेश

Omicron Variant ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक; रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

कोरोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना आणि कोरोनाची (Corona) मोठी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कोरोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना आणि कोरोनाची (Corona) मोठी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एका अभ्यासाअंती धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मूळ कोविड- १९ स्ट्रेन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta variant) तुलनेमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) ७० पट अधिक वेगाने पसरत आहे, असे या अभ्यासामध्ये आढळले आहे. या ताज्या स्ट्रडी रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये (Africa) आढळला आणि केवळ ३ आठवड्यामध्ये या व्हेरिएंटने तब्बल ७७ देशांमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळेच या व्हेरिएंटची लक्षणे, प्रादुर्भावाचा वेग, रुग्णवाढीचा दर, व्हॅक्सीन (Vaccine) या सर्वच बाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. आतापर्यंतच्या अभ्यासामधून हा व्हेरिएंट डेल्टाइतका घातक नाही पण अधिक वेगाने संसर्गाचा फैलाव होणार असल्याचे, असे सांगण्यात आले होते.

हे देखील पहा-

हाँगकाँग (Hong Kong) विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाने एका अभ्यासाचा प्राथमिक अहवाल लगेचच प्रसिद्ध केला असून त्यामध्ये धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांकडून उपलब्ध झालेल्या डेटाच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार, डेल्टा आणि मूळ कोविड (Covid) १९ स्ट्रेनच्या तुलनेमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट ७० पट वेगाने फैलावत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

ओमिक्रॉन बाधितांमध्ये गंभीर लक्षणे आढळत नसल्यामुळे या अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर पुढील २४ तासांत श्वसन यंत्रणेवर वेगाने परिणाम होताना दिसत आहे. आधीच्या व्हेरिएंटशी तुलना करता फुफ्फुसांवर दहापट कमी परिणाम होत आहे. यामुळेच हा व्हेरिएंट तितका घातक नाही असे म्हणता येईल. मात्र, व्हेरिएंटचा संक्रमण दर लक्षात घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये स्थिती गंभीर होऊ शकते.

व्हेरिएंट घातक ठरू शकतो, अशी भीती अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. मायकल चान ची- वाई यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले असून हे संशोधन सुरूच ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ओमिक्रॉनविषयी आतापर्यंत जो डेटा उपलब्ध आहे. तो लक्षात घेता अतिदक्षता विभागात दाखल करावे लागलेल्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे.

ऑक्सिजनची देखील फारशी गरज लागली नाही. आधी बाधित झालेल्या काही व्यक्तींना परत लागण झाल्याचे आढळले आहे. मात्र, लक्षणे मात्र गंभीर नाहीत. असे असतानाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सारखे करत आहे. गर्दी टाळा, योग्यप्रकारे मास्कचा वापर करा आणि स्वच्छता राखा, असा सल्ला देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT