मान्सून : होय, अंदाज चुकीचे होते ... हवामान खात्याची कबुली  Saam tv
देश विदेश

मान्सून : होय, अंदाज चुकीचे होते ... हवामान खात्याची कबुली

आयएमडीने 15 जूनपर्यंत दिल्लीत (Delhi) मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विहंग ठाकूर

मुंबई : मॉन्सूनबाबत (Monsoon) भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) चुकलेल्या भविष्यवाणीवर स्पष्टीकरण दिले आहे. देशातील आणि  दिल्लीतील  मान्सूनच्या प्रगतीविषयी हवामान खात्याने माहिती देताना प्रसिद्धीपत्रक जारी  केले. यावेळी हवामान खात्याने दिल्लीबद्दलचे आपले अंदाज चुकीचे असल्याचे मान्य केले आहे. '' देशातील इतर भागात मात्र मान्सूनच्या प्रगतीचा अचूक अंदाज वर्तविला. आयएमडीने 15 जूनपर्यंत दिल्लीत (Delhi) मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविला होता. यानंतर, 16 जून रोजी हवामान खात्याने मान्सूनचे दिल्लीत आगमन होण्यास विलंब दर्शविला होता. त्यानंतर  दिल्लीत १० जुलै  ला मान्सून येणार  असे सांगितले  होते . हे सगळे  अंदाज  चुकीचे  ठरले. हे क्वचितच घडते, अशा शब्दात हवामान खात्याने सांगितले. (The meteorological department has admitted that the monsoon forecast was incorrect)

गेल्या महिन्यापासून भारतीय हवामान विभागाने दिल्लीतील मान्सूनबाबत वर्तवलेले अंदाज सारखेच चुकीचे ठरत आहेत. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीत मान्सूनचे आगमन त्याच्या निश्चित तारखेपासून 16 दिवसांनंतर झाले आहे. गेल्या 19 वर्षात राजधानीत मान्सूनची ही सर्वात उशीरा एंट्री झाली आहे. यापूर्वी 2002 मध्ये 19 जुलै रोजी मान्सूनचे दिल्लीत आगमन झाले होते. दिल्लीत साधारणत: 27 जून पर्यंत मान्सून पोहचतो आणि 8 जुलै पर्यंत संपूर्ण देशभरात मान्सूनला सुरुवात होते. गेल्या वर्षीदेखील मान्सूनने 25 जूनलाच दिल्लीत प्रवेश केला होता तर 29 जूनपर्यंत संपूर्ण देशात मान्सूनला सुरुवात झाली होती.

मात्र यावर्षी हवामान खात्याने वर्तवलेले सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत. दिल्लीत मान्सून ची आगमन निश्चित तारखेच्या 12 दिवस आधीच म्हणजेच 15 जून रोजीचमान्सून दिल्लीत पोहचेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. मात्र वातावरणातील बदलांमुळे मान्सूनला उशीर झाला. त्यानंतर जूनच्या सुरूवातीला, 7 जुलै पर्यंत दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकेल, असे हवामान खात्याने सांगितले होते. मात्र हा अंदाज देखील चुकीचा ठरला. त्यानंतर दिल्लीत 10 जुलैच्या सुमारास पहिला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. तर शनिवारीदेखील हवामान विभागाने अंदाज सुधारत, येत्या 24 तासांत मान्सून राजधानीत धडकेल असे सांगितले मात्र तरीही दिल्लीकरांना रविवारी आणि सोमवारीदेखील पावसाची प्रतिक्षाच करावी लागली. असे चुकीचे अंदाज वर्तवल्यामुळे अखेर आज हवामान विभागाने चुकीच्या अंदाजांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत जामखेडमधून रोहित पवार फक्त ८४२ मतांनी आघाडीवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT