पणजी: पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने आजपासून अखेरचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याने विरोधक आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरण्याची शक्यता अधिक आहे. आमदार लुईझिन फालेरो यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे चारच आमदार असतील. (The last session of the Goa Legislative Assembly begins; Opponents will be aggressive)
हे देखील पहा -
भाजप सरकारच्या कार्यकाळातील या शेवटच्या अधिवेशनासाठी एकूण ४०२ प्रश्न विरोधी तसेच सत्ताधारी आमदारांनी विचारले आहेत. त्यापैकी ७७ प्रश्न तारांकित तर ३२५ प्रश्न अतारांकित आहेत. या व्यतिरिक्त गोवा वृक्ष संवर्धन हे एकमेव सरकारी विधेयक, पूरक मागण्या व विनियोग विधेयक कामकाजात चर्चेसाठी येणार आहेत. दिवसाला प्रत्येकी दोन लक्ष्यवेधी सूचना, शून्यतासावेळी उपस्थित करण्यात येणाऱ्या ५ ते ६ समस्यांचे प्रश्न येण्याची शक्यता आहे. याशिवाय शोकसंवेदना व अभिनंदन ठराव, सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीचा अहवाल पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती विधीमंडळ खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी विरोधकांमध्ये काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व मगो हे एकजुटीने सरकारविरोधात आवाज उठवत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गोवा फॉरवर्डला युतीसाठी ताटकळत ठेवले. त्यामुळे गोवा फॉरवर्डने त्यांचा नाद सोडून तृणमूल काँग्रेसकडे चर्चा सुरू केली आहे त्यामुळे अधिवेशनात काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यात समन्वय असण्यावर शंका आहे.
विधानसभेतील सर्व राजकीय पक्ष हे सध्या निवडणुकीच्या मुडमध्ये आहेत. विरोधकांनी सरकारला विचारलेले अनेक वादग्रस्त प्रश्न हे मागे ठेवण्यात आल्याने ते चर्चेस येण्याची शक्यता कमी आहे. हे शेवटचे अधिवेशन असले तरी अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसेच मगोचे सुदिन ढवळीकर हे आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.