The largest LIC IPO in India will be listed on the stock exchange today Saam Tv
देश विदेश

LIC IPO: भारतातल्या सगळ्यात मोठ्या एलआयसी आयपीओचं शेयर बाजारात होणार लिस्टींग

LIC IPO Marathi News : एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे ८८९ रुपये आणि ९०४ रुपये प्रति शेअर दराने शेअर्स मिळतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC IPO) आज (मंगळवारी) शेयर मार्केटमध्ये (Share Market) प्रवेश करणार आहे. २०,५५७ कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी (IPO) गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सरकारने एलआयसीच्या शेअर्सची किंमत 9४९ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे ८८९ रुपये आणि ९०४ रुपये प्रति शेअर दराने शेअर्स मिळतील. (LIC Listing on BSE, NSE Today: Time, Listing Price, Strategy, LIC Share Price, Details)

हे देखील पाहा -

ग्रे बाजार भाव काय चालले आहे (lic share price today in grey market)

एलआयसीचे शेअर्स आता ग्रे मार्केटमध्ये थोड्या सवलतीने व्यवहार करत आहेत. LIC चे शेअर्स अनऑफिशियल मार्केटमध्ये ९४९ च्या इश्यू किमतीच्या तुलनेत १५-२० रुपयांच्या सवलतीवर ट्रेडिंग करत होते.

बीएसई-एनएसई या दोन्ही ठिकाणी LIC IPO होणार लिस्ट

एलआयसीते स्टॉक मंगळवारी १७ मे ला बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या दोन्हीवर लिस्ट होणार आहेत. एलआयसीचा आयपीओ ९ मे ला बंद झाला आणि त्याचे शेअर्स १२ मे ला बोलीदारांना वाटप करण्यात आले होते. यातून सरकारने आयपीओद्वारे एलआयसीमध्ये २२.१३ कोटींपेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच ३.५ टक्के शेयर्स ऑफर केले आहे. यासाठी, किंमत श्रेणी ९०२ ते ९४९ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

तिप्पट पटीने सबस्क्रिप्शन

एलआयसीच्या आयपाओला जवळपास तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले. यामध्ये देशांतर्गत गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तर विदेशी गुंतवणूकदारांचा प्रतिसाद थंड होता. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे. सरकारने या मुद्द्यांद्वारे एलआयसीमधील आपला ३.५ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टेकच्या विक्रीतून सरकारला सुमारे २०,५५७ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.

आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ

एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी, २०२१ मध्ये आलेल्या पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा होता. त्याआधी, २०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ सुमारे १५,५०० कोटी रुपये होता.

आयपीओ म्हणजे काय? (what is Initial public offering)

आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial public offering) होय. जेव्हा एखादी मोठी कंपनी शेअर बाजारात पहिल्यांदा त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते तेव्हा त्यास आयपीओ म्हणतात. या प्रक्रियेत त्या कंपनीचे शेअयर्स सामान्य नागरिकांना खरेदीसाठी खुले केले जातात. अगदी साध्या भाषेत संगायचे झाले तर कंपनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शेअयर्सच्या माध्यमातून निधी जमा करते. हा निधी कंपनी त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी वापरते. त्या बदल्यात सामान्य नागरिकांना त्यांचे शेअयर्स मिळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागीदार झालेले असतात. तुमचे जितके शेअर्स तितकी तुमची भागीदारी. एखादी कंपनी अनेकदा त्यांच्या कंपनीचे आयपीओ बाजारात आणू शकते. आयपीओद्वारे कंपन्याना त्यांचा विस्तार करणे सुलभ जाते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT