जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांची संख्या 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला इशारा Saam Tv
देश विदेश

जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांची संख्या 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला इशारा

देशामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची चिंतेच आणखी भर पडतच आहे. गेल्या एका आठवड्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये तब्बल ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. त्याच पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनविषयी इशारा दिला आहे. WHO ने धोका कायम असल्याचे सांगितले आहे.

ओमायक्रॉन (Omicron)या कोरोनाच्या नव्या विषाणूने देशामध्ये कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. ज्या देशामध्ये डेल्टापेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे. त्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य (Health) संघटनेने म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, नव्या ओमायक्रॉनबाबत धोका अजून देखील अधिकच आहे.

हे देखील पहा-

ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा (Delta) व्हेरिएंटपेक्षा जास्त प्रमाणात पसरत असून अवघ्या २ ते ३ दिवसामध्ये ही रुग्ण (Patient) संख्या दुप्पट होत आहे. या वेगामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन (Britain) आणि अमेरिकेचा (America) देखील समावेश यामध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये (Africa) कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये २९ टक्क्यांनी घट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे सांगणे आहे.

दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा २४ नोव्हेंबर दिवशी ओमायक्रॉन व्हेरियंट आढळला होता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार डेल्टाच्या तुलनेमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. चीनमध्ये मागील २४ तासात कोरोनाचे २०० रुग्ण आढळले आहेत. मागील २० महिन्यांत ही सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचे सांगितले जात आहे. शांक्सी प्रांताची राजधानी शीआनमध्ये मागील २४ तासात १५० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT