मास्क नाही म्हणून गार्डने ग्राहकावर झाडली गोळी Saam Tv
देश विदेश

मास्क नाही म्हणून गार्डने ग्राहकावर झाडली गोळी

उत्तर प्रदेशातमध्ये एका व्यक्तीने मास्क लावला नाही म्हणून गार्डने चक्क गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बरेली - देशभरात कोरोना Corona काळात मास्क Mask लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना नागरिकांना पोलिसांनी कधी कोंबडा केला तर कधी रस्त्यावर बेडूक उड्या मारल्याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहे. मात्र उत्तर प्रदेशातमध्ये Uttar Pradesh एका व्यक्तीने मास्क लावला नाही म्हणून गार्डने Gaurd चक्क गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. The guard bank fired the customer

बरेलीमध्ये बँक ऑफ बडोदाकडून Bank Of Baroda मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने मास्क न लावल्यामुळे बँकेच्या गार्डने चक्क त्याच्यावर गोळी घातली आहे. त्यानंतर बराच वेळ ग्राहक बँकेतील फरशीवर पडून होता. तर त्याची पत्नी शेजारी बसून रडत होती.

हे देखील पहा -

बऱ्याच वेळानंतर रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपी गार्डला पोलिसांनी अटक केली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे गोळी घातल्यानंतरही गार्डला आपण केलेल्या चुकीची जाणीव नव्हती. रेल्वे कॉलनीत राहणारे राजेश राठोड पासबुक मध्ये एन्ट्री करण्यासाठी स्टेशन रोडजवळील बँक ऑफ बडोदामध्ये गेले होते. The guard bank fired the customer

राजेशची पत्नी प्रियंका राठोडने सांगितले की, राजेश यांनी मास्क लावला नव्हता, त्यामुळे गार्डने बँकेत येऊ देत नव्हता. त्यानंतर राजेश घरी जाऊन मास्क घेऊन आले. मात्र तरीही गार्डने त्यांना बँकेत घेण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गार्डने राजेशवर गोळी घातली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी हजर झाले. राजेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गार्डला ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT