लसीकरण नाही...तर राशन नाही; ग्रामपंचायतीचा अजब निर्णय

खोडशिवनी वासियो ही बातमी लक्षात घ्या. आता लसीकरण नाही तर सुविधांचा लाभ ही नाही. राशन पासून ही मुकावे लागणार.
लसीकरण नाही...तर राशन नाही; ग्रामपंचायतीचा अजब निर्णय
लसीकरण नाही...तर राशन नाही; ग्रामपंचायतीचा अजब निर्णयअभिजीत घोरमारे
Published On

अभिजीत घोरमारे

गोंदिया: खोडशिवनी वासियो ही बातमी लक्षात घ्या. आता लसीकरण नाही तर सुविधांचा लाभ ही नाही. राशन पासून ही मुकावे लागणार.आता गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी गावाने कोरोना लसीकरणबाबत ग्रामसभेत नवा ठराव घेतला असुन नागरीकांनी लसीकरण न केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे शासकीय दाखले आणि राशन न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गावात एकच खळबळ उडाली असून याचा परिणाम म्हणून गावात कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. कोरोनाचे लसीकरण न  केल्यास गावातील नागरीकांना सोयीसुविधा रोखणारं राज्यातील खोडशिवनी हे पहीले गाव असाव.

गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवनी गाव. आता हे गाव आपल्या नव्या निर्णयाने राज्यभर चर्चेत आले आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने गावाच्या वेशीवर येऊ नये यासाठी गावातील सर्व नागरीकांचे लसीकरण व्हावे यासाठी एक बैठक घेण्यात आली. बैठकीत गावातील 45 वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गावातील कित्येक नागरिकांनी लस उपलब्ध असतानाही घेतली नसल्याचे दिसून आले, यामुळे गावात 100 टक्के लसीकरणात अडचण होत आहे.

यावर 100 टक्के लसीकरण झाल्याशिवाय गाव पूर्णपणे सुरक्षित राहणार नसून लस न घेणारे कोरोना वाहक म्हणून गावात राहतील व गावात कोरोना प्रादुर्भावाचा धोका राहणार. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हे दाखवून दिल्याबाबत समजावून सांगण्यात आले. गावाला व गावकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी 100 टक्के लसीकरण करणे गरजेचे असून, यासाठी गावात आयोजित लसीकरण शिबिरात पात्र संपूर्ण लाभार्थ्यांनी लसीकरण करवून घेण्याचे ठरले. तसेच जो व्यक्ती लस घेणार नाही त्याला सरपंच, पोलीस पाटील व तलाठी कोणतेही दाखले देणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदार रेशन देणार नाही असा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com