शाळेच्या मैदानात सापडल्या 751 मुलांच्या कबरा  saam tv
देश विदेश

शाळेच्या मैदानात सापडल्या 751 मुलांच्या कबरा

गेल्या महिन्यातही शाळेच्या आवारात 215 मुलांचे मृतदेह पुरल्याचे आढळून आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॅनडामधील (Canada) निवासी शाळेत 751 मुलांचे कबरा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवासी शाळेच्या आवारातून पुरातत्व शास्त्रज्ञांना 751 कबरा (Grave) सापडल्या आहेत. सास्काचेवानची (Saskatchewan) राजधानी रेजिना (Regina) पासून 87 किलोमीटर अंतरवरील मार्व्हल इंडियन रेसिडेन्शियल स्कूलमध्ये (Marieval Indian Residential School) हे मृतदेह सापडले आहेत. 1899 ते 1997 पर्यंत मुले येथे अभ्यासासाठी येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यातील बऱ्याच मुलांचे मृतदेह पुरण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या महिन्यातही शाळेच्या आवारात 215 मुलांचे मृतदेह पुरल्याचे आढळून आले होते. कॉजेस फर्स्ट नेशनचे प्रमुख कॅडमुसन डेलमोर यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

कॅनडाच्या बहुतांश निवासी शाळा मैदानामध्ये आणखी कबर सापडण्याची शक्यता आहे. ट्रूथ एंड रिकांसिलिएशन आयोगाने पाच वर्षांपूर्वी संस्थेत मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा सविस्तर अहवाल दिला होता. यात कमीतकमी 3200 मुलांचा गैरवर्तन आणि दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. असे फेडरेशन ऑफ सॉवरेन इंडीजनिय फर्स्ट नेशन्सचे प्रमुख बॉबी कॅमेरून सांगितले आहे. तर, गेल्या महिन्यात कॅनडामधील दुसर्‍या शाळेत 200 हून अधिक मृतदेह सापडले होते. जमिनीखाली वस्तूंचा शोध लावणाऱ्या ऑब्जेक्ट डिटेक्शन रडारच्या मदतीने 215 मुलांचे मृतदेह सापडले असल्याचे ब्रिटिश कोलंबियामधील सलीश-भाषिक गटाच्या प्रथम देशाच्या प्रमुख, रोजेन्ने कॅस्मीर यांनी संगीतले आहे. ही घटना समोर आल्यानंतर सणेक सामाजिक नेत्यानी सर्व निवासी शाळांच्या मैदानेचे उत्खनन करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, 1915 ते 1963 या काळात कॅमेलोप्स स्कूलमध्ये कमीतकमी 51 मुलांचा मृत्यू झाला होता. कॅम्लूप्स स्कूल 1890 ते 1969 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर फेडरल सरकारने कॅथलिक चर्चकडून या शाळेचा कार्यभार आपल्या हाती घेतला. त्यानंतर ही शाळा 1978 मध्ये बंद झाली. असे ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर जॉन हॉर्गन नमूद केले. त्यानंतर अनेक वर्षांनी कॅनडा सरकारने 2008 मध्ये या अमानवीय वागणुकीबद्दल औपचारिकरित्या माफीही मागितली होती. मात्र रोमन कॅथोलिक चर्चने (ज्या बहुतेक शाळा चालवतात) त्यांनी अद्याप माफी मागितली नाही.

1915 ते 1963 मुलांना कुटुंबापासून दूर आलेल्या शाळांमध्ये पाठवले जायचे, याठिकाणी मुलांना एकटेपणाचा सामना करावा लागायचा. अनेकदा या ठिकाणी त्यांच्यावर अकल्पनीय अत्याचार सहन करावा लागायचं. विशेष म्हणजे, 1970 च्या दशकापर्यंत कॅनेडियन समाजात दत्तक घेण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दीड लाखाहून आधिल मुले फर्स्ट नेशन्स सरकारी अनुदानीत ख्रिश्चन शाळांमध्ये शिकत होते. यावेळी त्यांना मातृभाषा बोलण्याची परवानगी नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांना ख्रिश्चन धर्माचे आचरण आणि धर्मांतरण करण्याची सक्ती केली जायची. बर्‍याच मुलांना मारहाण होत असे. अत्याचार केले गेले त्यामउले या काळात 6,000 मुलांचा मृत्यू झाला. अशी माहितीही या अहवालातून समोर आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT