नवी दिल्ली : 25 जून 1983 ... हा भारतीय क्रीडा इतिहासातील अविस्मरणीय दिवस आहे. 38 वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी भारतीय संघ लॉर्ड्स येथे वर्ल्ड कप चँपियन (World Cup Champion) बनला. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजवर- 43 धावांनी आश्चर्यकारक विजय नोंदवून भारताने प्रथमच विश्वचषक जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षेविरूद्ध धक्कादायक कामगिरी दाखवत ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडीजसारख्या (West Indies) दिग्गज संघांना हरवून विश्वविजेते बनले. (June 25, 1983: An unforgettable day in the history of Indian sports)
याची आठवण करत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या अनेक संघांनी 38 वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या विजयाची आठवण केली. याबाबत बीसीसीआयने ट्विट करत या दिवसाची आठवण केली आहे. #OnThisDay in 1983: भारतीय क्रिकेट विश्वातील एक ऐतिहासिक दिवस. कपिल देव (Kapil Dev) यांच्या संघाने विश्वचषक जिंकला. असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल या संघांनीही ऐतिहासिक दिवसाची आठवण केली आहे. याच दिवशी जेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला.
असा जिंकला विश्वचषकाचा सामना
38 वर्षंपूर्वी झालेल्या सामन्यात एकीकडे दोनवेळा विश्वचषक जिंकलेला वेस्ट इंडीजचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मागील दोन विश्वचषकात (1975, 1979) खराब कामगिरी करणारा भारतीय संघ. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. या सामन्यात भारताने 54.4 षटकांत (त्यावेळी 60 षटकांच्या एकदिवसीय मालिका खेळल्या जायच्या) 183 धावा केल्या होत्या. कृष्णामाचारी श्रीकांतने भारतासाठी सर्वाधिक 38 धावा केल्या, या अंतिम सामन्यातील सर्वात जास्त वैयक्तिक स्कोअर असल्याचे सिद्ध झाले.
विंडीजसाठी हे मोठे लक्ष्य नव्हते, परंतु बलविंदरसिंग संधूने गॉर्डन ग्रीनिजला केवळ एका रणमध्ये आऊट करुन भारताला जबरदस्त यश मिळवून दिले. अवघ्या पाच धावांवर कॅरेबियन संघाला धक्का बसला. मात्र, यानंतर विव्हियन रिचर्ड्सने जलद फलंदाजी करताना 33 धावा केल्या.
- कपिल देवने रिचर्ड्सचा अप्रतिम झेल पकडला
आपल्या खेळावर मजबूत पकड बसवलेल्या रिचर्ड्सने अचानक मदन लालच्या चेंडूवर मध्य विकेटसाठी जोरदार शॉट खेळला. त्याच्या मागे धावताना कपिलने अप्रतिम झेल घेतला. भारतीय संघाने केवळ 57 च्या स्कोअरवर विंडीजने तिसरी विकेट घेतली. या जबरदस्त विकेटमुळे भारतीय संघाचा उत्साह द्विगुणित झाला.
रिचर्ड्स बाद झाल्यामुळे वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव कोलमाडून पडला. वेस्ट इंडिजच्या केवळ 76 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या. अखेर संपूर्ण संघ 52 षटकांत 140 धावांत गुंडाळला गेला. मायकेल होल्डिंगची विकेट शेवटची विकेट पडली आणि लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला. मदन लालने 31 धावा आणि तीन विकेट, मोहिंदर अमरनाथने 12 धावा देत तीन विकेट तर संधूने 32 धावा देऊन दोन विकेट्स घेत वेस्ट इंडिज संघाचे आव्हान मोडीत काढले. उपांत्य फेरीनंतरही मोहिंदर अमरनाथने अष्टपैलू कामगिरीसह (26 धावा आणि 3 गडी बाद) सामनावीराचा किताब पटकावला.
Edited By- Anuradha Dhawade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.