Telangana Accident @ANI
देश विदेश

Telangana Accident: नववीतल्या मुलाने फूटपाथवरील मजुरांना कारने चिरडले; चौघांचा बळी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: फूटपाथवर चढलेल्या गाडीखाली (Car) चिरडून (Crush) चौघांचा मृत्यू (Four dead) झाल्याची धक्कादायक घटना तेलंगणात (Telangana) घडली आहे. तेलंगणामधील करीमनगर भागात फूटपाथवर काही मजूर बसले होते. अचानक नियंत्रण सुटून एक कार फुटपाथवर चढली आहे. यामध्ये ३ महिला आणि १ लहान मुलीचा बळी गेला आहे. एक अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार चालवता येत नसताना देखील केवळ सराव (Practice) करण्याकरिता तो गाडी चालवत असल्या मिळाली आहे. त्याच्याबरोबर त्याचे मित्र (Friend) देखील कारमध्ये बसले असल्याचे पोलिसांनी (police) सांगितले आहे. (The boy crushed workers on sidewalk with car)

हे देखील पहा-

तेलंगणामधील (Telangana) करीमनगर भागात सकाळी ६ वाजेच्या सुमाराला भरधाव वेगाने एक कार रस्त्याने जात होती. सकाळची वेळ असल्याने परिसरामध्ये धुके पसरले होते. यामुळे रस्त्यावर दृश्यमानता कमी होती आणि केवळ काही फूट अंतरावरच चित्र तुटक दिसत होते. अशा परिस्थितीमध्ये वेगाने कार चालवत नववीत शिकणारा एक मुलगा रस्त्याने जात होता. फुटपाथपाशी कार आल्यावर त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक (Break) दाबण्याऐवजी त्याने अचानक ऍक्सिलरेटरवर पाय दिला होता.

यामुळे गाडी थांबण्याऐवजी प्रचंड वेगाने फूटपाथकडे गेली आणि फूटपाथवर चढली आहे. या फूटपाथवर काही मजूर झोपले होते. इतर कुठलाही निवारा नसल्याने फूटपाथवर राहणाऱ्या या मजुरांपैकी ३ महिला आणि १ चौदा वर्षांची मुलगी गाडीखाली सापडली आहे. त्यात तिघींचा जागीच मृत्यू झाला, तर चौथीचा हॉस्पिटलमध्ये (hospital) घेऊन जात असताना वाटेतमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर २ मजूरही जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

फूटपाथवर गाडी चढून चौघींचा मृत्यू झाल्यावर गाडी चालवणारा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे २ अल्पवयीन मित्र गाडी तिथेच सोडून पळून गेले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाच्या ताब्यात गाडी दिल्याप्रकरणी गाडीमालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हे मजूर झोपडपट्टीत राहत होते. मात्र नगरपालिका (Municipality) प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहिमेअंतर्गत झोपड्या हटवले होते. मजुरांना तिथून हाकलून दिले होते. त्यानंतर हे मजूर फूटपाथवरच झोपत होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT