वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) मधील कानपूर (Kanpur) येथे रविवारी रात्री भीषण अपघाताची (Terrible accident) घटना घडली आहे. या अपघातात एका बसने तब्बल १७ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहेत तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. शहरात टाटमिल चौकात या ई- बसचे (E-bus) नियंत्रण सुटल्याने अन् ती एकापाठोपाठ एक अशा १७ गाड्यांवर जाऊन धडकली आहे. (Out of control e bus hits 17 vehicles Uttar Pradesh Accident)
हे देखील पहा-
घंटाघर येथून टाटमिल येथे ही बस जात होती. यावेळी, वाहनाला धडक दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि बस वेगाने घेऊन जाण्याच्या नादात टाटमिल चौकात एका उभ्या असलेल्या डंपरला (dumper) धडकली. यानंतर, ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पलायन केले आहे. ई- बसची जबाबदारी आणि मेन्टेनन्सचे चालन करणाऱ्या पीएमआय (PMI) एजन्सीने घटनेविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
हॅरिसगंज रेल्वे पुलावरुन (Railway bridge) उतरताच या ई-बसने कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी राँग साईडने धावायला सुरूवात केली होती. बसने २ कार, १० दुचाकी, २ ई-रिक्षा आणि ३ टेम्पोला धडक देऊन टाटमिलकडे पुढे जात होती. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा जनकल्लोळ झाला होता. यानंतर, टाटमिल येथे एका डंपरला बसने जोराची धडक दिली. यानंतर, चालकाने तिथून धूम ठोकली आहे. या दुर्घटनेमध्ये एकून ६ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत.
दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली आहे. इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.