Thalapathy Vijay’s TVK party takes massive lead in Tamil Nadu election trends Saam TV
देश विदेश

Tamil Nadu Election Results: मोठी उलथापालथ! थलापति विजय मुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर

Tamil Nadu election results live : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर दिसत असून थलापती विजय यांच्या TVK पक्षाने १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. डीएमके आणि एआयएडीएमके मागे पडल्याने विजय मुख्यमंत्री होणार का? याची चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Thalapathy Vijay TVK leading Tamil Nadu election 2026 : सुपरस्टार थलापति विजय यांच्या TVK पक्षामुळे तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ केली आहे. तामिळ लोकांना विजय यांच्यावर विश्वास दाखवल्याचे चित्र सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला १०५ जागांवर आघाडी मिळाली आहे. २३१ जागांचे सुरूवातीचे कल समोर आले आहेत, त्यामध्ये विजय यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या विजय यांना घवघवीत यश मिळाले आहे. डीएमके ५२ आणि एआयएडीएमके ७६ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये थलापति वजय मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

तामिळ जनतेने थलपति विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल्याचे मतपेट्या उघडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यामध्येच वर्षानुवर्षे लढत होत होती. पण विजय यांनी अभिनय सोडून राजकारणाच्या मैदानात प्रवेश केला अन् उलथापालथ झाली. विजय याच्या एन्ट्रीने तामिळनाडूच्या राजकारणाचे गणित बदलले आहे. तामिळनाडूमध्ये एकतर्फी सत्ता यंदा कुणालाही येईल, असे चित्र कमीच आहे.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये स्टॅलिन यांचा डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात चुरशीची लढत होती. पण मतमेट्या उघडल्यानंतर थलपती विजय यांनी जोरदर मुसंडी मारली. १० वाजताच्या आसपस विजय यांच्या पक्षाने आघाडी घेण्यास सुरूवात केली. सध्या विजय यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. विजय यांच्या पक्षाने १०० जागांचा मॅजिक फिगर पार केला आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने दमदार पदार्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार विजय यांचा पक्ष १०३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या कलांनुसार, TVK आपल्या पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षितपणे आघाडीवर आलाय. AIADMK च्या नेतृत्वाखालील आघाडी ७६ जागांवर आघाडीवर आहेत. तर DMK च्या नेतृत्वाखालील आघाडी सध्या सुमारे ५२ जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे २३४ जागांच्या या लढतीत सुरुवातीच्या कलांमध्ये विजय यांचा पक्ष १०४ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Fire Safety: ACमुळे आग अन् गुदमरून मृत्यू! बंद खोल्यांमधल्या या चुका ठरतील जीवघेण्या, वेळीच व्हा सावध

Vijay Thalapathy: विजय थलपती ते खुशबू सुंदर; २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकांमध्ये कोणत्या 'पॉवर स्टार'च्या पक्षाची येणार सत्ता?

Election Result Live : केरळमध्ये मुख्यमंत्री पिछाडीवर, काँग्रेस उमेदवार आघाडीवर

Baramati rahuri bypolls election results: सातव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 29657 मतांनी आघाडीवर

Indorikar Maharaj : मुलीच्या लग्नासाठी १० एकराचा मांडव, ३ लाख पाहुणे; शाही थाटावरून इंदोरीकर महाराजांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT