tamil nadu news  Saam tv
देश विदेश

तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

thalapathy vijay news : तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरल्याचं समोर आलं आहे. थलपती विजय यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. व्हीसीके पक्षाच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Vishal Gangurde

तमिळनाडूत मोठी उलथापालथ

टीव्हीके पक्षाने गाठला बहुमताचा आकडा

व्हीसीके पक्षाने दिला टीव्हीके पक्षाला दिला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. तामिळनाडूत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्षाने मागील दशकातील डीएमके पक्षाची सत्ता उलथवून लावली आहे. चार पक्षांच्या पाठिंब्याने टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झालं आहे. २ आमदार असलेल्या व्हीसीके पक्षाने विजय यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. यामुळे थलपती विजय यांचा सत्ते स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालानंतर तमिळनाडूत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. विधानसभा निवडणुकीनंतर थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला.

टीव्हीके पक्ष मागील ४ दिवसांत बहुमत सिद्ध करू शकला नव्हता. मात्र, आज शनिवारी टीव्हीके पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. मोक्याच्या क्षणी २ आमदार असलेल्या व्हीसीके पक्षाने पाठिंबा दिला. व्हीसीके पक्षानंतर IUML पक्षानेही पाठिंबा दर्शवला. यामुळे तमिळनाडूत १२० आमदारांच्या पाठिंब्यामुळे थलपती विजय यांचा सत्तेस्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

थोल तिरुमावलन यांच्या नेतृत्वातील व्हीसीके पक्षाने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा जाहीर केला आहे. व्हीसीके पक्षाने पाठिंबा दिल्याने आता तमिळनाडूत सत्तास्थापनेसाठी घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. व्हीसीके यांच्या पाठिंब्यामुळे थलपती विजय यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हीसीके पक्षाच्या नेत्यांनी टीव्हीके पक्षाच्या नेत्याची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

तमिळनाडूत व्हीसीके पक्षाव्यतिरिक्त IUML या पक्षानेही टीव्हीके पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाच्या नेत्यांनी पाठिंब्याचं पत्र व्हीसीके पक्षाला दिलं. IUML पक्षाच्या नेत्यांनी सायंकाळी टीव्हीके पक्षाच्या नेत्याची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सोपवलं. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटीचेही फोटो समोर आले आहेत. आता थलपती विजय हे उद्या राज्यपालाची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयी सविस्तर माहिती समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT