Thalapathy Vijay takes oath as Tamil Nadu Chief Minister, later resigns from one of his two विधानसभा seats as per constitutional norms. saam tv
देश विदेश

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Thalapathy Vijay Resign From One Seat After Becoming CM: तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांनी तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघाचा राजीनामा देत पेरंबूर जागा कायम ठेवली.

Omkar Sonawane

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवणारे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी तिरूचिरापल्ली पूर्व मतदारसंघाचा राजीनामा दिला असून, त्यांनी पेरबर ही जागा आपल्याकडे कायम ठेवली आहे. TVK प्रमुख विजय यांनी आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 23 एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्हीकडे दणदणीत विजय मिळवला होता. नियमानुसार एका जागेचा राजीनामा देणे आवश्यक असल्याने त्यांनी तिरूचिरापल्ली पूर्व जागा सोडण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत विजय यांच्या दोन जागांसाह TVK पक्षाला एकूण 108 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता एक जागा सोडल्यामुळे पक्षाचे संख्याबळ 107 झाले आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी विजय यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यांनी आपले राजीनामा पत्र मंत्री के.ए. सेंगोट्टैयन आणि पी. व्यंकटरमण यांच्यामार्फत विधानसभेचे प्रधान सचिव के. श्रीनिवासन यांच्याकडे सुपूर्द केले. रविवारी एका भव्य समारंभात विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित होते. तामिळनाडूमध्ये गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच द्रमुक (DMK) आणि अद्रमुक (AIADMK) व्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे.

शपथविधी सोहळ्याला संबोधित करताना थलपती विजय म्हणाले, मी कोणत्याही राजघराण्यातून आलेलो नाही. मी तुमच्यासारखाच आहे, तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. एका सामान्य चित्रपट दिग्दर्शकाचा मुलगा म्हणून माझा जन्म झाला, त्यामुळे मी गरिबी जवळून अनुभवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT