BANGKOK TRAIN BUS ACCIDENT: 8 DEAD, MASSIVE EXPLOSION SHOCKS THAILAND AI
देश विदेश

Accident News : रेल्वेचा भीषण अपघात! क्रॉसिंगजवळ ट्रेन-बसची एकमेकांना जोरदार धडक, ८ जणांचा मृत्यू

Bangkok Railway Bus Accident News : बँकॉकमध्ये ट्रेन आणि बसच्या भीषण धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. धडकेनंतर बसला आग लागून स्फोट झाला.

Alisha Khedekar

  • बँकॉकमध्ये ट्रेन-बसची भीषण धडक

  • ८ जणांचा मृत्यू, २०+ जखमी

  • धडकेनंतर बसचा स्फोट

  • सिग्नल त्रुटीची शक्यता, तपास सुरू

थायलंडची राजधानी बँकॉक येथे शनिवारी दुपारी एक भीषण अपघात घडला आहे. ट्रेन आणि बसच्या धडकेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात राचाथेवीतील रेल्वे क्रॉसिंगवर झाला. धडकेनंतर बसला भीषण आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात २० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राचाथेवीतील रेल्वे क्रॉसिंगजवळ वेगाने येणाऱ्या रेल्वे आणि बसची भीषण धडक झाली. या धडकेत बसला आग लागून भीषण स्फोट झाला आणि परिसरातील अनेक वाहनांचं नुकसान झालं. या अपघातात ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर काही क्षणांतच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. धडकेनंतर निर्माण झालेल्या आगीमुळे बचावकार्याला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता, मात्र पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.

दरम्यान, थायलंडचे उप परिवहन मंत्री सिरीपोंग अंगकासाकुलकियात यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, बस रेल्वे क्रॉसिंगवर लाल सिग्नलमुळे थांबली होती. त्यावेळी रेल्वे फाटक पूर्णपणे खाली येण्याआधीच मालगाडी वेगाने येत होती. मालगाडीचे वजन खूप जड असल्याने चालकाला वेळेवर ब्रेक लावणे शक्य झाले नाही आणि त्यामुळेच ही भीषण धडक झाली.

या अपघातामुळे स्थानिक वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने थायलंडमध्ये शोककळा पसरली असून, प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rose Water For Hair: केस होतील सिल्की आणि कोंडा होईल गायब! अश्या पद्धतीने केसांना लावा 'गुलाबपाणी'

Maharashtra News Live Update : देशातील सर्वाधिक हॉट सिटी अमरावतीत तापमानाचा पारा ४६ अंशावर

Fort In Ratnagiri : कोकणातील लपलेले ऐतिहासिक रत्न! नदी अन् अरबी समुद्राच्या संगमावर वसलाय 'हा' भव्य किल्ला

Low Blood Sugar : रक्तातील साखरेची पातळी कमी होणेही धोकादायक, शरीराच्या 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम

EPFO Pension Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ₹३००० होणार

SCROLL FOR NEXT