Elon Musk On UNSC Saam Digital
देश विदेश

Elon Musk On UNSC: हा तर सरळसरळ मूर्खपणा! भारताला UNSC चे कायम सदस्यत्व नसल्याने भडकले एलॉन मस्क

Sandeep Gawade

Elon Musk On UNSC

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी भारताला सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या संस्थांमध्ये सुधारणा करण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर एलॉन मस्ट यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

टेस्टाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. निर्णायक क्षणी संयुक्त राष्ट्रात सुधारणांची गरज आहे. मात्र अडचण ही आहे की शक्तीशाली देश ते सोडायला तयार नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळत नाही, हा मूर्खपणा आहे. आफ्रिकेलाही कायम सदस्यत्व मिळालं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आफ्रीका खंडातील एकाही देशाला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व नाही. संयुक्त राष्ट्राच्या संस्था आताच्या परिस्थिवर आधारित बनल्या पाहिजेत, ना की ८० वर्षांपूर्वी सारख्या. दरम्यान सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फ्यूचर जागतिक सुधारणा परिषदेत यावर विचार करण्याची संधी आहे. यावर माइक आइजनबर्ग यांनी, आणि भारताबाबत आपला काय विचार आहे? संयुक्त राष्ट्रालाचा बर्खास्त करून एका चांगल्या नेतृ्त्वात नवीन संस्था उभारली जाऊ शकते का?, असा प्रश्न उपस्थित केला.

सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच देश कायम सदस्य आहेत. याव्यतिरिक्त आणखी १० देशांचा समावेश आहे, मात्र या देशांना कायम सदस्यत्व नाही. रशिया, इंग्लंड, चीन, फ्रान्स आणि अमेरिका या पाच देशांनाच सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व आहे. भारत देखील सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वाचा प्रबळ दावेदार असून यामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT