Elon Musk Yandex
देश विदेश

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एलोन मस्कने काही दिवसांपूर्वीच भारताचा दौरा रद्द केला होता. या भारत दौऱ्यावर असताना मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. या बैठकीत टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेतील प्रवेशावरही चर्चा होणार होती. मात्र अचानाक एलोन मस्क यांनी चीनला भेट दिली आहे. एलोन मस्कच्या (Elon Musk)या दौऱ्याबद्दल कोणालाही सांगण्यात आलेले नव्हते,परंतू फ्लाइट ट्रॅकिंग ॲपनुसार, एलोन मस्क यांच्या खाजगी जेटचे लोकेशन हे बीजिंगमध्ये असल्याचे समजते. चीनच्या दौऱ्यादरम्यान एलोन मस्क यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली.

मात्र एलोन मस्क यांनी अचानक चीनचा दौरा का केला असावा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. टेल्सा कंपनी भारतीय बाजारात येण्याच्या तयारीत आहे, पण चीनला ते आवडलेले नव्हते. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने त्यांच्या एका लेखात असे लिहिले आहे की,भारतीय बाजारात येऊन टेल्सा कंपनीला उतरती कळा लागेल,कारण भारतात त्यांच्या लॉन्च होणाऱ्या कारसाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. एलोन मस्क २१ आणि २२ एप्रिल रोजी भारतीय दौऱ्यावर येणार होते,मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी सोशल मीडियावर पोस्ट केली होती,ज्यात भारतात न येत असल्याची माहिती दिली तसेच या वर्षभरात भारत भेट देणार असल्याचेही सांगितले.

चीन ही दुसरी मोठी वाहन बाजारपेठ...

चीनही जगातील दुसरी सर्वांत मोठी वाहन बाजारपेठ आहे. एलोन मस्क यांची टेल्सा कंपनी अनेक वर्षांपासून चीनमध्ये आहे.परंतू, सध्या टेल्सा कंपनीला अनेक आव्हानांना तोंड देत आहे. टेल्सा कंपनीला चीनमध्ये 'फुल- सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर' लॉंच करायचे आहे. एवढेच नव्हे तर कंपनीला स्वायत्त ड्रायव्हिंग तंत्रज्ञानासाठी अल्गोरिदमचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने चीनमध्ये गोळा केलेला डेटा परदेशात हस्तांतरित करायचा आहे. ज्यामुळे ते ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानामध्ये वापरता येईल. मात्र डेटा ट्रान्सफरबाबत संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

FSD (पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंगबाबात) चर्चा सत्र

टेल्सा FSD कंपनी ही त्यांच्या ऑटोपायलट तंत्रज्ञानाची सर्वात आधुनिक आवृत्ती नवीन बाजारपेठेत आणण्यावर सध्या काम करत आहे. अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान चार वर्षांपासून उपलब्ध आहे मात्र, ते चीनमध्ये लॉन्च झाले नाही.याचे मुख्य कारण हे चीन सरकारने टेस्लाला देशातील प्राप्त झालेला डेटा परदेशात हस्तांतरित करण्याची मान्यता दिलेली नाही.

याच महिन्यात एलोन मस्कने एक्सवर एका यूजरला प्रतिक्रिया देताना म्हटले की, चीनमध्ये लवकरच पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD)सॉफ्टवेयर आणले जाऊ शकते. टेल्सा कंपनीने अलीकडेच अमेरिकेमध्ये एफएसडीची साधारण किंमत यूएस डॉलर १२,००० वरुन यूएस डॉलर ८,००० पर्यंत कमी केली आहे.

चीनसमोरील आव्हाने

चीनमध्ये स्थित असलेल्या अनेक स्थानिक कंपन्यांनी टेल्सा कंपनीला अडचणीत आणले आहे. यावेळी चीनमध्ये अनेक ऑटो शो सुरु आहेत. गेल्या आठवड्यात सुरु झालेला ऑटो शो ४ मेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र चीनमधील सर्वात मोठ्या ऑटो शोमध्ये टेल्सा कंपनीचे बूथ नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT