पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अबू सैफुल्लाचा खात्मा ! File Photo
देश विदेश

Jammu Kashmir | पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अबू सैफुल्लाचा खात्मा !

२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अबू सैफुल्लाचा भारतीय लष्कराने चकमकीदरम्यान खात्मा केला आहे.

वृत्तसंस्था

श्रीनगर : २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा Pulwama येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद संघटनेचा (JeM) दहशतवादी अबू सैफुल्लाचा (Abu saifullah alias Lamboo) भारतीय लष्कराने चकमकीदरम्यान खात्मा केला आहे.

अबू सैफुल्ला, ज्याला अदनान, इस्माईल आणि लांबू अश्या नावांनी ओळखले जायचे. त्याला एनकाउंटर मध्ये ठार करण्यात भारतीय जवानांना Indian Army यश आले आहे. सैफुल्ला काश्मीर खोऱ्यात २०१७ पासून अतिरेकी कारवाया करण्यासाठी सक्रिय होता. त्याच्यासोबतच अजून एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश मिळाले असून या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

हे देखील पहा -

जम्मू चे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सैफुल्ला १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासहीत इतर दहशहतवादी हल्ल्यांमध्ये देखील सहभागी होता. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद संघटनेतील इतर दहशतवादी अदनान रौफ अजहर, मौलाना मसूद अजहर आणि अम्मार यांचा तो अत्यंत विश्वासू साथीदार होता. अबू सैफुल्ला तालिबान या दहशतवादी संघटनेशी देखील संबंधित होता.

सैफुल्ला हा अफगाणिस्तान आणि भारतातील पुलवामा येथे 2019 च्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेल्या वाहनात आयईडी स्फोटक बसवण्यात तरबेज होत. अबू सैफुल्ला केवळ जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या संपर्कात नव्हता तर तालिबानशीही तो निगडित होता. सैफुल्ला अवंतीपोरा, पुलवामातील काकपोरा आणि पंपोर येथे जैश-ए-मोहम्मदला आणि तालिबानला बळकट करण्यासाठी मदत करत होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी आज सकाळी जम्मू -काश्मीरमधील दोन वेगवेगळ्या दहशतवादी प्रकरणांच्या संदर्भात 14 ठिकाणी छापे टाकले. एनआयएने 7 किलो आयईडी आणि लष्कर-ए-मुस्तफा प्रमुख हिदायतुल्लाह मल्लिक याला ताब्यात घेण्याच्या दोन प्रकरणांच्या संदर्भात जम्मूच्या 14 भागात आज छापा टाकला, हिदायतुल्लाह मल्लिक याला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मूच्या एका बसस्टॉपवर पकडण्यात करण्यात आले होते.

या दोन्ही प्रकरणांच्या संदर्भात एनआयएच्या NIA अधिकाऱ्यांनी आज सकाळी पुलवामा, शोपियां, श्रीनगर, अनंतनाग, जम्मू आणि बनिहाल येथे छापा टाकला. अटक केलेल्या हिदायतुल्लाह मल्लिकने चाचणीदरम्यान अनेक गुप्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडून एक M-4 रायफल, एक ग्लॉक बंदूक आणि अजून पिस्तूल जप्त केला आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT