Firing on LoC  Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला, LOC वर गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Pakistan Firing On LoC: पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी तळ नष्ट केले. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकड्यांकडून एलओसीवर भारताच्या दिशेने गोळीबार सुरू आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला.

Priya More

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तामध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू आणि ३८ जण जखमी झाले आहेत.

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील लष्कर -ए -तोएबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ नष्ट केले. ९ दहशवाद्यांचे तळांवर भारतीय सैन्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झालेत तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने एलओसीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली.

पाकिस्तानी सैन्यानी एलओसीवर केलेल्या गोळीबारामध्ये १० काश्मिरी नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३८ जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानचे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशामध्ये जम्मू काश्मीरमधील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पुंछमधील सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT