political news  Saam tv
देश विदेश

प्रसिद्ध खेळाडू भाजपमध्ये प्रवेश करणार? पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

bjp news : प्रसिद्ध खेळाडू भाजपमध्ये प्रवेश करण्यची शक्यता आहे. त्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्षांची भेट घेतली.

Vishal Gangurde

निवडणुकीमुळे घडामोडींना वेग

प्रसिद्ध टेनिस खेळाडू पेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीआधी भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. कारण प्रसिद्ध टेनिस खेळाडू लिएंडर पेस हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पेसने मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची कोलकातामध्ये भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पेस हा पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसू शकतो.

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्प्याचं मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी देखील केली आहे. आयोगानेही मतदारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे.

पेसचा २०२१ साली टीएमसीत प्रवेश

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान लिएंडर पेस भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. लिएंडर पेसने भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्याचा उपयोग पक्षाकडून केला जाऊ शकतो. पेसचा चेहरा वापरून युवा मतदारांना वळवण्याचे काम भाजपकडून केले जाऊ शकते. लिएंडर पेसने ऑक्टोबर २०२१ साली गोव्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश केला. परंतु त्याला गोव्यात त्याचा राज्य स्तरीत कमिटीत समावेश करण्यात आलेला नाही.

अर्घ्य राय प्रधान यांची भाजपमध्ये एन्ट्री

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी टीएमसी नेते अर्घ्य राय प्रधान यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अर्घ्य राय प्रधान कूचबिहारच्या विकासासाठी लढलेले व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांनी २०१६ सालापासून ते यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर काम केलंय. अर्घ्य रॉय प्रधान हे अनेक वर्षांपासून टीएमसीचे सदस्य होते. त्यांचे वडील अमर रॉय प्रधान हे देखील बंगालच्या राजकारणात सक्रिय नेते होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Homemade Coconut Lassi Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकोनट लस्सी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

Pune News: पुण्यातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, पाणी पिताना विजेचा धक्का लागला अन् चैतन्य खाली पडला

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' विरोधात FIR दाखल; VIDEO शेअर करत आर. माधवननं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-"मैंने सिगरेट..."

How To Make Chemical Free Vitamin C Serum: घरच्या घरी केमिकल फ्री व्हिटॅमिन सी सीरम कसा बनवायचा? वाचा सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT