Mohammad Mahmood Ali Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: पुष्पगुच्छ द्यायला उशीर... मंत्र्याने अंगरक्षकाच्या कानाखाली लगावली; संतापजनक VIDEO

Mohammad Mahmood Ali Viral Video: महमूद अली यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Telangana Home Minister Viral Video:

पुष्पगुच्छ द्यायला उशिरा झाल्याने तेलंगनाच्या गृहमंत्र्यांनी अंगरक्षकाच्या कानाखाली लगावल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. महमूद अली यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली ((Mohammad Mahmood Ali) हे पशुसंवर्धन मंत्री श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमावेळी त्यांनी शुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, गृहमंत्री मोहम्मद महमूद अली हे श्रीनिवास यादव यांना आलिंगन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी ते पाठीमागे वळून अंग रक्षकाकडे पुष्पगुच्छ मागितला. मात्र त्याच्या हातात गुच्छ नसल्याने मंत्रीमहोदयांना राग आला आणि त्यांनी थेट त्याच्या कानाखाली लगावली.

पीटीआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शुक्रवार (६, ऑक्टोंबर) चा असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रया दिल्या आहेत. मंत्र्यांच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच या कृतीबद्दल भाजपनेही टीका केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT