HMPV outbreak in China saam tv
देश विदेश

भारत पूर्णपणे तयार; चीनच्या HMPV व्हायरसमुळे सरकार अलर्ट, गाइडलाइन जारी

telangana government News : HMPV व्हायरसमुळे संपूर्ण जगात दहशत पसरली आहे. भारतातील विविध राज्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने गाइडलाइन जारी केली आहे.

Saam Tv

चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या ह्यूमन मेटानिमोव्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनासारखी महामारी पसरू नये, यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे. भारताचीही या व्हायरसच्या रुग्णावर नजर आहे. भारत या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही. या व्हायससमुळे तेलंगणा सरकारने गाइडलाइन जारी केली आहे.

तेलंगणा सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, चीनवरून येणाऱ्या ह्यूमन मेटानिमो व्हायरसच्या वृत्तामुळे सतर्क झालो आहोत. तेलंगणा राज्य आणि केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय एकत्र मिळून लक्ष देत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केलं की, अफवांपासून सावध राहा'. तेलंगणाच्या आरोग्य विभागाने राज्याने श्वसनासंबंधित रुग्णांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२४ च्या तुलनेत डिसेंबर २०२३ मध्ये या आजाराशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही.

काय करावे?

खोकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू ठेवावा.

हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावे. तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.

गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आजारसदृश्य व्यक्तीपासून अंतर ठेवावे.

ताप, खोकला सर्दी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.

पाणी भरपूर प्यावे. पौष्टिक भोजन करणे.

सर्व ठिकाणी पुरेशे वेंटिलेशन आहे का, हे तपासून घ्यावे.

आजारी असल्यास घरात राहावे. आजारी व्यक्तीने दुसऱ्याच्या संपर्कात राहू नये.

पुरेशी झोप घ्या.

काय करू नये?

हात मिळवण्यापासून दूर राहावे.

टिश्यू पेपर किंवा रुमालाचा वारंवार वापर करावा.

आजारी लोकांच्या संपर्कात राहू नये.

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नये.

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.

चीनमधील श्वसनाच्या आजारांची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील देखरेख गटाची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय विविध माध्यमांतून चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच WHO ला परिस्थितीबाबत वेळेवर अपडेट्स शेअर करण्याची विनंती करण्यात आली आहे. श्वासोच्छवासाचे आजार हाताळण्यासाठी तयार असून पाळत ठेवण्यामध्ये कोणतीही असामान्य वाढ दिसून येत नसल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT