Hyderabad Shock Family of Three Dies Saam
देश विदेश

मुलीच्या आत्महत्येनंतर आई वडील खचले, कुटुंबानं आयुष्य संपवलं, सुसाईट नोटमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?

Hyderabad suicide case: हैदराबादमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. मुलीच्या मृत्यूनंतर आई वडिलांनीही आयुष्य संपवलं. कुटुंब आर्थिक अडचणींचा करत होता सामना.

Bhagyashree Kamble

तेलंगणातील हैदराबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली आहे. मोठ्या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का बसला होता. त्यानंतर आई वडिलांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. 'देव आम्हाला बोलवत आहे', असं म्हणत मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी आयुष्य संपवलं.

हे धक्कादायक प्रकरण हैदराबादमधील अंबरपेट येथील मल्लिकार्जून नगर येथून उघडकीस आले आहे. श्रीनिवास, त्यांनी पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी काव्या या तिघांनी आत्महत्या केली. श्रीनिवास यांच्या मुलीची तब्येत कायम बिघडलेली असायची. तिच्या मृत्यूनंतर आई वडिलांना धक्का बसला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब काही महिन्यांपूर्वीच अंबरपेट येथे स्थलांतरीत झाले होते. त्यांची मुलगी काव्या हिनं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आई वडिलांनीही आत्महत्या केली. २ दिवस श्रीनिवास आणि त्यांची पत्नी घराबाहेर आली नाही, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून नातेवाईकांना धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये 'आम्ही आमच्या लेकीकेड जात आहोत', असं लिहिलं होतं. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी रग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra Death: जय-विरूची जोडी तुटली; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन भावुक

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २२ जण जखमी

Dharmendra Ikkis Film: 'वो इक्कीस का था...', धर्मेद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, फोटो पाहून चाहते इमोशनल

मुंबईकरांना हक्काचं घर मिळणार, वरळीत म्हाडा बांधणार २ गगनचुंबी टॉवर्स; एक ८५ तर दुसरा ५८

Makyacha Chivda Recipe: मक्याचा कुरकुरीत चिवडा घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT