देश विदेश

CMO साठी 650 कोटीचा खर्च; तरीही CM ऑफिसची पायरी चढेना! मुख्यमंत्र्यांना कसली भीती? चर्चांना उधाण

Telangana CM Revanth Reddy: तेलंगणातील नवीन मुख्यमंत्री कार्यालय ६५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं. पण मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे मुख्यमंत्री कार्यालयात जात नाहीत, त्यामागील धक्का कारण समोर आलंय.

Bharat Jadhav

  • तेलंगणातील सीएमओसाठी ६५० कोटी खर्चून सात मजली इमारत बांधण्यात आली.

  • वास्तुदोष आणि राजकीय कारणांमुळे मुख्यमंत्री कार्यालयात जात नाहीत.

  • इतकं भव्य ऑफिस बनवल्यानंतरही ते कार्यालयात का जात नाहीत.

तब्बल ६५० कोटी रुपये खर्चून सात मजली इमारतीचं भव्य मुख्यमंत्री कार्यालय बांधण्यात आलं. मंत्री,मुख्य सचिव आणि उच्च नोकरशहांची कार्यालयेही तेथेच आहे, तरीही मुख्यमंत्री सीएमओची पायरी चढेनात. तुम्ही म्हणाल मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसेन. अन् हे प्रकरण कुठलंय? हे प्रकरण आहे, तेलंगणामधील. आणि हो, तेलंगणातील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी अगदी ठणठणीत आहेत, तरीही ते कार्यालायात जात नाहीत. इतकं भव्य ऑफिस बनवल्यानंतरही ते कार्यालयात का जात नाहीत? त्यांना कसली भीती अशी चर्चा आता होतेय.

मुख्यमंत्री कार्यालयात न जाण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यानंतर राजकारणाची चर्चा आहेच, शिवाय त्यात वास्तू दोषाचेही कारण असल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री त्यांचे सर्व काम बंजारा हिल्स येथील तेलंगणा पोलीस कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून करत आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कार्यकाळात सीएमओची ही नवीन इमारत पूर्ण झाली. त्यांनी ३० एप्रिल २०२३ रोजी त्याचे उद्घाटन केले.

डिसेंबरमध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान केसीआर यांनी वास्तू तत्वांवर आधारित नवीन सचिवालय बांधण्याचे कामही सुरू केलं. जुने सचिवालय इमारत वास्तू तत्वांनुसार बांधलेली नाहीये, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या दोन कार्यकाळात, त्यांनी जुन्या सचिवालयाला फक्त २४वेळा भेट दिली होती. त्यांनीही राज्याचा कारभार बहुतेक काम प्रगती भवन या कॅम्प ऑफिसमधून केलं.

मंत्रिमंडळाच्या बाबी लीक होतायत लीक

मुख्यमंत्री रेवंथ यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले की, केसीआर यांचे अनेक निष्ठावंत कर्मचारी अजूनही सचिवालयात उपस्थित आहेत. जेव्हा रेवंथ रेड्डी नवीन इमारतीत राहायला गेले, तेव्हा अनेक बैठकांची माहिती लीक झाली होती. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या फोन टॅपिंग घोटाळ्यामुळे रेवंथ रेड्डी यांचा संशय आणखी बळावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री पोलीस कमांड सेंटरमधूनच कारभार हाकत आहेत.

इमारतीत वास्तुदोष

काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं की, इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार मूळतः पूर्वेकडे होतं. परंतु ते बंद करून तो दरवाजा आग्नेय दिशेला हलवण्यात आलं. केसीआर सुरुवातीला पूर्वेकडून प्रवेश करत होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद केलं होतं. रेवंथ यांचे निकटवर्तीय म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यापासून, रेवंथ यांना नवीन इमारतीत वारंवार अस्वस्थता जाणवत होती. चौकशीतून वास्तुदोष आढळून आले. या समस्या सोडवण्याऐवजी, मुख्यमंत्र्यांनी पोलिस नियंत्रण कक्षात राहणे पसंत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT