Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Pune Police Seize Evidence: निलेश घायवळच्या अडचणीत आता आणखी वाढ झालीय.. घायवळला परदेशातून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मोठा डाव टाकलाय... घायवळची अटक कधी होणार? घायवळचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कशी फिल्डिंग लावलीय?
Pune Police coordinate with Interpol as the Blue Corner notice is issued for fugitive Nilesh Ghaiwal.
Pune Police coordinate with Interpol as the Blue Corner notice is issued for fugitive Nilesh Ghaiwal.Saam Tv
Published On

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळालेल्या निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी आता मोठा डाव टाकलाय...घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिस थेट इंटरपोलची मदत घेणार आहेत..

पुणे पोलिसांच्या पत्र व्यवहारानंतर इंटरपोलनं घायवळविरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस जारी केलीय.. फौजदारी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीची ओळख आणि त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ही नोटीस काढली जाते... त्यामुळे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन अर्थात इंटरपोल आंतरराष्ट्रीय स्तरावर घायवळचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना मदत करणार आहे.

दुसरीकडे पुणे पोलिसांनी विशेष 'मकोका' न्यायालयाकडे घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केलीय...तर घायवळच्या घरातून मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय..निलेश घायवळशी संबंधित लोकांची चौकशीही सुरु आहे.. घायवळला चारही बाजुंनी घेरण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून सुरु आहे. मात्र घायवळला भारतात आणण्यात किती कालावधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com