Who is kattipalli Venkata Ramana Reddy Saamtv
देश विदेश

Venkata Ramana Reddy: गडी एकटा 'लढला', दिग्गजांना नडला! माजी अन् भावी मुख्यमंत्र्यांना आस्मान दाखवणारा जायंटकिलर; कोण आहेत कट्टीपल्ली वेंकट रेड्डी?

Telangana Assembly Election Result 2023: निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी एका उमेदवाराच्या विजयाची मात्र जोरदार चर्चा होत आहे. तो उमेदवार म्हणजेच कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी.

Gangappa Pujari

Who is kattipalli Venkata Ramana Reddy :

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशमध्ये शिवराज चौहान यांनी सत्ता कायम ठेवली असून राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. तेलंगणामध्ये मात्र कॉंग्रेसने मुसंडी मारत सत्ता काबीज केलीय. भाजपचा मात्र तेलंगणामध्ये दारुण पराभव झालाय. तेलंगणामध्ये भाजपला फक्त आठ ठिकाणी विजय मिळवण्यात यश आले आहे.

निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी एका उमेदवाराच्या विजयाची मात्र जोरदार चर्चा होत आहे. तो उमेदवार म्हणजेच कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांचा पराभव करुन कट्टीपल्ली रेड्डी हे जायंट किलर ठरलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिग्गजांचा केला पराभव?

कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी (kattipalli Venkata Reddy) हे तेलंगणातील कामारेड्डी विधानसभा (Kamareddy) मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले. त्यांच्या समोर तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री आणि बीएसआर प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) आणि कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांचे तगडे आव्हान होते. या त्रिशंकू लढतीत विजय मिळवत वेंकट रमना रेड्डी हे किंगमेकर ठरले.

कट्टीपल्ली वेंकट रेड्डी यांनी 6741 मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 66,652 मतं मिळाली. तर त्यांच्या खालोखाल मुख्यमंत्री केसीआर यांनी ५९,९११ मते घेतली. तर कॉंग्रेसचे रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांना ५४,९१६ मते मिळाली आहेत. या दणदणीत विजयानंतर कट्टीपल्ली वेंकट रेड्डी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपच्या नेत्यांनीही या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोण आहेत कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी?

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे ५३ वर्षांचे असून ते व्यापारी आहेत. त्यांनी फक्त १२ वीपर्यंत शिक्षण घेतलयं. घोषित केलेल्या संपत्तीनुसार त्यांच्याकडे सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रेड्डी यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत, पण त्यांनी कामरेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा आणि रुग्णालये बांधली आहेत.

या दणदणीत विजयानंतर कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी आपल्या जनतेचे आभार मानले असून त्यांनाच या विजयाचे श्रेय दिले आहे. दरम्यान, दोन दिग्गजांना धुळ चारणाऱ्या या पठ्ठ्याची सोशल मीडियावरही तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT