Telangana Assembly Social Media
देश विदेश

Telangana Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक; भाजपने जाहीर केली उमेदवारांची यादी

Telangana Assembly : तेलंगणा विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने तीन खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.

Bharat Jadhav

Telangana Assembly Election 2023:

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रचाराच्या तयारीला लागला आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत ५२ उमेदवारांचे नाव आहे. भाजपने तेलगंणा भाजपचे माजी अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांना करीमनगरमधून उमेदवारी दिलीय. (Latest News)

तेलंगणा विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने तीन खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. बंदी संजय कुमारसह सोयम बापू राव यांना बोआथच्या जागेवरून तिकीट दिलंय. अरविंद धर्मपुरी यांना कोरातला येथून उमेदवारी देण्यात आलीय. तसेच टी राजा सिंह यांना गोशामहल तेथून तिकीट देण्यात आलंय. इटाला राजेंद्र सिंह यांना हुजुराबाद आणि गजवेल या दोन जागेवरून तिकीट देण्यात आलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या यादीत ५२ उमेदवारांचे नावे जाहीर केली आहेत. यात तीन खासदार आणि १२ महिलांना तिकीट देण्यात आलंय. तर तेलंगणाचे आयटी मंत्री आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलगा केटीआरच्या विरोधात सिरसिला जागेवर भाजपने राणी रुद्रमा रेड्डी यांना उमेदवारी दिलीय. तर बीआरएस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या इटेला राजेंद्र यांना हुजुराबाद येथून तिकीट देण्यात आलंय. दरम्यान भाजपमध्ये दाखल होण्याआधी ते येथील आमदार होते.

तर आज भाजपने तेलंगणाचे एकमेव आमदार टी राजा सिंह यांचे निलंबन रद्द केलं. पैंगबर मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे टी राजा सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने त्यांचे निलंबन केले होते. दरम्यान त्यांचे निलंबन रद्द केल्यानंतर भाजप त्यांना परत एकदा तिकीट देऊन उमेदवार बनवणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. दरम्यान पक्षाने निलंबन रद्द केल्यानंतर टी राजा सिंह यांनी पक्षश्रेष्ठी आणि जनतेचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT