Telangana Assembly Election-2023: Saam TV
देश विदेश

Telangana Assembly Election-2023: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; तेलंगणात विधानसभेसाठी उद्या मतदान, २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Telangana Assembly Election-2023: तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास पावणे दोन महिने सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Telangana Assembly Election-2023

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास पावणे दोन महिने सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. ३ कोटी २६ लाख १८ हजार मतदारांच्या हातात या उमेदवारांचे भवितव्य असणार आहे. ३ डिसेंबरला मजमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या तुलनेत तेलंगणाचा निवडणुकीचा काळ खूप मोठा होता. या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे. भाजपनेही तेलंगणाच्या प्रचारात पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोड शो चे आयोजन केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणुकीत बीआरएस प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर), त्यांचे पुत्र केटी राव, तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, भाजपचे खासदार बंदी संजय कुमार, डी. अरविंद आणि सोयम बापूराम यांच्यासह २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. केसीआर कामरेड्डी आणि गजवेलमधून निवडणूक लढवणार आहेत. तर रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामरेड्डीमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने आमदार एटाळा राजेंद्र यांना हुजूराबाद व्यतिरिक्त गजवेलमधून उमेदवारी दिली आहे. याच मतदार संघातून ते गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. दरम्यान सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये रोड शो केला.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ३ कोटी २६ लाख १८ हजार २०५ मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ कोटी ६२ लाख ९८ हजार ४१८ पुरुष मतदार आणि १ कोटी ६३ लाख १ हजार ७०५ महिला मतदारांची संख्या आहे. तर २ हजार ६७६ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी आहे. निवडणुक रिंगणात उतरलेल्या २२९० उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती असून मतपेढीत बंद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT