Mayonnaise Ban Saam Tv
देश विदेश

Mayonnaise Ban: मोमोज खाऊन महिलेचा मृत्यू; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; मेयोनीजवर बंदी

Mayonnaise Banned In Telangana: तेलंगणा सरकारने मेयोनीजच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. हैदराबादमध्ये मोमोज खाऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आली आहे.

Siddhi Hande

सर्वांनाच फास्ट फूड खायला खूप आवडते. त्यात मोमोज, फ्राइज, बर्गर हे पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. या सर्व पदार्थांमध्ये मेयोनीज हा पदार्थ असतोच. परंतु आता मेयोनीजवर बंदी घालण्यात आली आहे. तेलंगणा सरकारने बुधवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा सरकारने एका वर्षासाठी मेयोनीजच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये मोमोजमधील मेयोनीजमुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. (Mayonaise Ban In Telangana)

हैदराबादमध्ये (Hyderabad) मोमोज खाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्याचसोबत २० जण आजारी पडले होते. त्यानंतर लगेचच एका दिवसाच्या आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणा राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. पुढच्या एका वर्षापर्यंत मोमोजपासून ते अगदी कोणत्याही पदार्थात मेयोनीजचा वापर केला जाणार आहे.

मेयोनीजच्या उत्पादनावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आदेशानुसार, तपासानुसार आणि लोकांकडून आलेल्या तक्रारींनुसार गेल्या महिन्यातील विषबाधाच्या घटनांमध्ये मेयोनीज कारण असल्याचे समोर आले आहे. मेयोनीज हा पदार्थ अनेक फास्टफूडमध्ये वापरला जातो. सँडविच, मोमोज, फाइज अशा अनेक पदार्थांमध्ये मेयोनीज वापरला जातो. (Mayonaise Banned)

मंगळवारी हैदराबादमधील ३१ वर्षीय महिलेचा मोमोज खाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या दुकानात मोमोज खाल्याने २० लोक आजारी पडले. या सर्व दुकांनाना एकाच कंपनीकडून मेयोनीज पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Hyderabad Women Died by Eating Momos)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: दिवाळीच्या दिवसात घरात सुख समृद्धी येण्यासाठी 'या' वास्तु टिप्स फॅालो करा

Bigg Boss 18 : कन्फेशन रूममध्ये मोठा खुलासा! बिग बॉसने ईशाला दाखवला रजतचा खरा चेहरा

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा 'फुसका बार'; ऋतुराज 'गोल्डन डक', अख्खा संघ 107 धावांवर तंबूत

Mehndi Design: दिवाळी सणानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या डिझाइन्स

Kalyan Assembly Election: कल्याणमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार, दिग्गज नेत्यासह मतदारांची डोकेदुखी वाढणार

SCROLL FOR NEXT