Politician Viral Video With Girlfriend X
देश विदेश

Viral Video : कमरेभोवती हात, आरशासमोरच मिठी, बंद खोलीत बड्या नेत्याच्या व्हिडिओने मोठी खळबळ

Politician Viral Video With Girlfriend : लालू प्रसाद यादव यांचा थोरला मुलगा तेज प्रताप यादव याने विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिली. तो १२ वर्षांपासून अनुष्का यादवसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

बिहारच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना लालू प्रसाद यादव यांच्या परिवारामध्ये मोठा कलह असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मुलाने म्हणजेच तेज प्रताप यादवने विवाहबाह्य रिलेशनशिपची जाहीरपणे कबुली दिली आहे. यानंतर लालू यांनी तेज प्रतापची पक्षातून हकालपट्टी केला आहे. थोरल्या मुलाला त्यांनी कुटुंबातून बेदखल देखील केले आहे. याचदरम्यान तेज प्रताप यादव आणि त्याच्या कथित गर्लफ्रेंडचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तेज प्रताप यादव त्याच्या गर्लफ्रेंडसह एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तेज प्रताप यादव आणि त्याची गर्लफ्रेंड, अनुष्का आरशासमोर उभे आहेत. अनुष्काच्या हातामध्ये मोबाईल आहे, ती दोघांनाही आरश्यातून रेकॉर्ड करत आहे. अनुष्काला तेज प्रतापने मागून मिठी मारल्याचे व्हिडीओत दिसते. तो अनुष्काच्या कंबरेवर हात ठेवून तिच्या गालावर चुंबन देत असल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या व्हायरल व्हिडीओमुळे तेज प्रताप यादव चर्चेत आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा थोरला मुलगा तेज प्रताप यादवने विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानेही रिलेशनशिपचा खुलासा केला. पण काही वेळातच ती पोस्ट काढून टाकण्यात आली. पण त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही माहिती समजताच लालू प्रसाद यांनी तेज प्रतापला कुटुंबातून आणि पक्षातून बाहेर काढले.

तेज प्रताप यादवच्या विवाहबाह्य संबंधांवर त्याची पत्नी ऐश्वर्याने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. तेज प्रतापला पक्ष आणि कुटुंबातून हाकलून देणे हे एक नाटक आहे. या नाटकामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. तेज प्रतापवर झालेली कारवाई हा नाटकाचा भाग आहे. जेव्हा मला मारहाण झाली होती, तेव्हा लालूंचा न्याय कुठे होता, असे ऐश्वर्याने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT