Bihar Viral Video Saam Tv
देश विदेश

विद्यार्थ्यास बेदम मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल; 'ताे' निष्ठूर शिक्षक अटकेत

आरोपी अमरकांत हा मूळचा जेहानाबाद जिल्ह्यामधील मंडई गावचा रहिवासी आहे.

वृत्तसंस्था

पाटणा - शिक्षकाचा दर्जा देवाच्या बरोबरीचा आहे. शिक्षकच आपल्या भविष्याचे मार्गदर्शन करतात योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगतात, पण पाटणा (Patna) येथील एका शिक्षकाने योग्य आणि चुकीचा फरक सांगण्याऐवजी स्वतःच एक मोठी चूक केली. या शिक्षकाने ६ वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका कोचिंग सेंटरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक एका ६ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे आणि जेव्हा काठीचे दोन तुकडे झाले तेव्हा शिक्षकाने मुलाला लाथा मारण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये मुलगा रडताना आणि मारू नका अशी विनंती करताना दिसत आहे. शिक्षकाची बेदम मारहाण मुलाला सहन न झाल्याने अखेर तो बेशुद्ध पडला. तर आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते पण या शिक्षकाला कोणीही विरोध केला नाही. शिक्षकानं विद्यार्थ्याला केलेली मारहाण एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

हे देखील पाहा -

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या कोचिंक क्लास शिक्षकाला हुडकून काढत त्याला अटक केली आहे. पाटणा पोलिसांनी त्याची स्वतःहून दखल घेऊन कारवाई केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन यांच्या सूचनेनंतर, पोलिसांनी एफआयआर नोंदवून ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर, आरोपी अमरकांत कुमार हा नालंदा जिल्ह्यातील तेल्हाडा पोलीस स्टेशन परिसरात काका मनोज कुमार यांच्या घरी लपला होता, तिथून पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली.

आरोपी अमरकांत हा मूळचा जेहानाबाद जिल्ह्यामधील मंडई गावचा रहिवासी आहे. अमरकांत हा बीर ओय्यारा महादेव जागेमध्ये जया पब्लिक स्कूल चालवत होता. या शाळेचा तो प्राचार्यही आहे. इथं तो एक कोचिंग सेंटरही चालवत होता. पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करत शाळेतील सर्व संगणक, फर्निचर आणि कागदपत्रं जप्त केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

SCROLL FOR NEXT