Tamilnadu Fraud 
देश विदेश

Tamil Nadu Scientist Cheated : राज्यपाल करतो, ५ कोटी घेतले; नाशिकच्या भामट्याने शास्त्रज्ञाला लावला चुना

Tamil Nadu Scientist Cheated : राज्यपाल करण्यासाठी 15 कोटी लागतात, असे सांगून फसवणूक केली. तामिळनाडूतील नससिम्मा रेड्डी यांची फसवणूक करण्यात आली.

Dhanshri Shintre

देशातील कोणत्याही राज्याचा राज्यपाल करतो, असे सांगून 5 कोटींची फसवणूक केली आहे. नाशिकच्या भामट्याने तामिळनाडूतील शास्त्रज्ञाची फसवणूक केली. संशयित निरंजन कुलकर्णी विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची ओळख आहे, राज्यपाल करण्यासाठी 15 कोटी लागतात, असे सांगून फसवणूक केली. तामिळनाडूतील नससिम्मा रेड्डी यांची फसवणूक करण्यात आली.

याचदरम्यान नरसिम्मा रेड्डी आणि दामोदर रेड्डी यांनी तक्रार दाखल केली दिली. संशयित निरंजन कुलकर्णी (४०, सेवन श्री अपार्टमेंट, मोटवानी रोड, नाशिकरोड) यांना अटक करण्यात आली. रेड्डी यांनी ०७ फेब्रुवारी ते ०२ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयिताला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले आहे. त्यापैकी ६० लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वतः सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँक खात्यात जमा केले होते.

शयिताने रेड्डी यांना जानेवारीमध्ये शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावले होते. अनेक राजकीय मंडळांशी आपला परिचय असल्याचा दावा करुन कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले. हे काम करण्यासाठी १५ कोटी रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. पुढील भेटीत संशयित कुलकर्णीने विश्वास संपादन करण्यासाठी हे काम करता न आल्यास आपल्या नावावरील जमिनीचे खरेदीखत रेड्डी यांच्या नावे करून देण्याची तयारी आहे असे सांगितले.

मात्र पोलिसांनी गुप्तता पाळून संशयिताला अटक केली. रविवारी ०८ नोव्हेंबर रोजी संशयितास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर मुंबई नाका पोलिसांकडून प्रकरणाचा खुलासा करण्यात आला. याप्रकरणी संशयित जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT