Tamilnadu Minister Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: जेव्हा मंत्रीसाहेब संतापतात! चिडलेल्या मंत्र्यांनी थेट कार्यकर्त्यांवरचं केली दगडफेक, पाहा नेमकं काय झाल?

संतापलेल्या नासार यांनी ढिगाऱ्यातून दगड उचलत थेट कार्यकर्त्यांवर भिरकवायला सुरूवात केली.

Gangappa Pujari

Viral Video: नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील नाते जगजाहीर आहे. मोठे मोठे नेते आपल्या कार्यकर्त्यांना जपण्याचा त्यांच्या अडचणीत मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र सध्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. ज्यामध्ये एक मंत्री थेट कार्यकर्त्यांवर दगडफेक करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ तामिळनाडूच्या मंत्र्यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया काय आहे या व्हायरल व्हिडिओची संपूर्ण कहाणी.. (Viral Video)

याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूचे दुग्धविकास मंत्री एस एम नासार हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका गावात आले होते. श्री.नासर यांनी अधिकाऱ्यांसह सकाळी कार्यक्रम स्थळी भेट दिली. यावेळी जमीन सपाट केली जात होती आणि मंत्री ढिगाऱ्यासमोर उभे होते.

बराच वेळ ते ताटकळत उभे राहिले तरीही कार्यकर्त्यांनी काही मंत्र्यांना बसायसा खुर्ची दिली नाही. यावरुनच ते संतापले.

कार्यकर्त्यांनी खुर्ची आणण्यास विलंब केल्याने संतापलेल्या नासार यांनी ढिगाऱ्यातून दगड उचलत थेट कार्यकर्त्यांवर भिरकवायला सुरूवात केली. दगड भिरकावत त्यांनी कार्यकर्त्यांना जा खुर्ची आणा, म्हणत चांगलेच खडसावले.

सध्या मंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळातील हे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक कारणांमुळे ते वादात अडकले होते. या व्हिडिओनंतर भाजपाने (BJP) जोरदार टीका करत "भारताच्या इतिहासात आजपर्यंत एखाद्या मंत्र्याने जनतेवर दगडफेक केल्याचे पाहिले आहे का," असा सवाल उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT