DMK Panchayat President Saam Tv
देश विदेश

तक्रारदाराला बड्या नेत्यानं संपवलं, चारचाकीनं चिरडलं; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

DMK Panchayat President: डीएमकेचे नेते आणि पंचायत अध्यक्ष विनायगम पलानीस्वामी यांना एका व्यक्तीला कारखाली चिरडल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

  • डीएमके नेत्याच्या कारनं एका व्यक्तीला चिरडलं.

  • मृत व्यक्ती दुचाकीवरून जात असताना उडवलं.

  • पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर.

तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. डीएमके नेत्याला कारने एका व्यक्तीला चिरडल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पलानीस्वामी हे दुचाकीवरून जात होते. यादरम्यान डीएमके नेत्याच्या चारचाकी वाहनानं दुचाकीला उडवलं. तसेच दुचाकीस्वाराला चिरडलं. सुरूवातीला हे प्रकरण हिट अँड रन असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

विनायगम पलानीस्वामी असे आरोपीचे नाव आहे. ते तामिळनाडूतील तिरूपूर जिल्ह्यातील पंचायत अध्यक्ष असल्याची माहिती आहे. तर, पलानीस्वामी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलानीस्वामी दुचाकीवरून गावाच्या दिशेनं जात होते. दरम्यान, विनायगम पलानीस्वामी हे दुचाकीच्या मागून चारचाकीवरून आले.

चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. तसेच दुचाकीस्वाराला चिरडले. सुरूवातीच्या तपासात डीएमकेचे नेते त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे हे प्रकरण हिट अँड रन असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पुढील तपासात कुटुंबाने संशय, तसेच या घटनेमागे वैयक्तिक वैर असल्याची शक्यता व्यक्त केली.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे डीएमके नेत्याशी काही दिवसांपासून गंभीर मतभेद होते. त्यांनी खासगी रस्त्याची मालकी पंचायतीला देण्यास विरोध केला होता. या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादामुळे संबंधित व्यक्तीची हत्या केली असल्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. या प्रकरणात तपास करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT