Tamilnadu bus accident  Saam tv
देश विदेश

Major Accident : भयंकर! दोन बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू

Major Accident in tamilnadu : तामिळनाडूमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात दोन बसची समोरासमोर धडक, ११ जणांचा मृत्यू

या अपघातात ४० प्रवासी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड

मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून घटनेवर शोक व्यक्त

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात रविवारी दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. तामिळनाडूच्या कुम्मानगुडी रोडवर हा अपघात झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

लाईव्ह हिंदूस्थानच्या वृत्तानुसार, एक बस तिरुप्परवरून कराईकुडी येथे जात होती. दुसरी बस कराईकुडी येथून दिन्दिगुल येथे जात होती. शिवगंगा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिव प्रसाद यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. अपघाताची मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदतीला सुरुवात केली.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दोन बसचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरु झाली. अपघातानंतर स्थानिक लोकही मदतीला धावून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना शिवगंगा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

अपघातानंतर घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'रस्त्यावर प्रवाशांचे मृतदेह पडल्याचे दिसत आहेत. एक महिला बसच्या समोर रडताना दिसतेय. दोन्ही बसच्या काचा फुटल्या आहेत. एक महिला जमिनीवर बसलेली दिसतेय. तर एका महिलेचे डोके रक्तबंबाळ झालं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT