Vijay Thalapathy Political News Saam tv
देश विदेश

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

Tamil Nadu TVK Vijay Thalapathy News : तमिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण? AIADMK नेते EPS यांनी विजय यांच्या TVKविरोधात आघाडीचे संकेत देत DMKला सोबत येण्याचे आव्हान दिले.

Alisha Khedekar

  • विजय थलपती यांचे सरकार पडणार?

  • तमिळनाडूमध्ये मोठ्या घडामोडींना वेग

  • पक्षांतर्गत समीकरणांवर परिणाम

तमिळनाडूच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यात यशस्वी झालेल्या सी. जोसेफ विजय यांच्यासमोर आता विरोधकांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विजय यांच्या TVK विरोधात विविध पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

AIADMKचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एडाप्पडी के. पळनिस्वामी हे टीव्हीकेविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत स्पष्टपणे सांगितले की, AIADMK पक्ष TVK च्या विरोधात आहे. तसेच इतर कोणत्याही पक्षाला आमच्यासोबत या आघाडीत सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, पळनिस्वामी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकलाही अप्रत्यक्षपणे या आघाडीत सहभागी होण्याचे आव्हान दिले. “डीएमके आमच्यासोबत येईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एआयएडीएमके आणि डीएमकेसारखे राजकीय प्रतिस्पर्धी टीव्हीकेविरोधात एकत्र येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर AIADMKच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून विजय यांच्या गटाला साथ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, डीएमकेने अद्याप एआयएडीएमकेच्या या प्रस्तावावर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. यापूर्वी डीएमके नेते आर. एस. भारती यांनी दोन्ही पक्षांच्या संभाव्य एकत्र येण्याबाबत चर्चा फेटाळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

Liver warning signs: लिव्हर खराब होण्यापूर्वी नखांवर दिसतात 3 संकेत; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

SCROLL FOR NEXT