Thalapathy Vijay Saaam tv
देश विदेश

Vijay Thalapathy: मुख्यमंत्र्यांनी विश्वास जिंकला, थलपती विजय यांना १४४ आमदारांनी केलं मतदान, कोणता पक्ष फुटला?

Tamil Nadu Assembly: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी पुन्हा विश्वास जिंकला. आज त्यांना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. यामध्ये १४४ आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले.

Priya More

Summary:

  • मुख्यमंत्री थलपती विजय यांनी पुन्हा विश्वास जिंकला

  • टीव्हीके सरकारची बहुमत चाचणी यशस्वी

  • थलपती विजय यांना १४४ आमदारांनी पाठिंबा दिला

  • तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला

  • एआयएडीएमके पक्षाच्या बंडखोरांनी विजय सरकारला पाठिंबा दिला

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. टीव्हीके नेते आणि अभिनेता थलपथी विजय यांनी काँग्रेससह अनेक लहान पक्षांचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केली. १० मे रोजी थपलपती विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री थलपती विजय यांना आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. सरकार स्थापन करण्यासाठी संघर्ष कराव्या लागलेल्या विजय थलपती यांनी विश्वासदर्शक ठरावात १४४ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. तर २२ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी बुधवारी तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासाठी एक प्रस्ताव मांडला. ज्यामध्ये टीव्हीके आघाडी सरकारला १४४ आमदारांनी पाठिंबा दिला. २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव पार करण्यासाठी थलपती विजय यांच्या सरकारला ११८ आमदारांची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावादरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. डीएमकेने मतदान करण्यास नकार दिला आणि विधानसभेतून सभात्याग केला.

विश्वासदर्शक ठरावामध्ये काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांनी थलपती विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला. भाजप आणि अंबुमणी रामदोस यांच्या नेतृत्वाखालील पीएमकेने मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. मात्र, एआयएडीएमकेच्या बंडखोर गटाने विजय यांच्या समर्थनार्थ मतदान करण्याची घोषणा केली. एस. पी. वेलुमणी यांच्या नेतृत्वाखालील या गटाला पक्षाच्या ४७ आमदारांपैकी ३० आमदारांचा पाठिंबा आहे आणि यापैकी किमान २५ आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या बाजूने मतदान केले. सभागृहात घडलेल्या या घडामोडींनंतर विजय यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये १४४ आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळाले.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांना आधीच १२० आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. मंगळवारी मद्रास हाय कोर्टाने टीव्हीकेच्या एका आमदाराला सभागृहात प्रवेश करण्यास मनाई केली. त्यामुळे विजय यांच्या सरकारच्या बहुमताचा ठराव मंजूर करण्याच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्ती केली जात होती. पण थलपती विजय यांनी सरकार स्थापन करण्यापाठोपाठ विश्वासदर्शक ठरावाच्या परीक्षेतही यश मिळवले. दरम्यान, साऊथ सुपरस्टार विजय थपलती यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश करत टीव्हीके पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत टीव्हीके पक्षाने २३४ पैकी १०७ जागा जिंकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

Kalyan : 'लुडो'चा वाद टोकाला गेला, रागाच्या भरात मामाने भाच्याचा काटा काढला; कल्याणमधील खळबळजनक घटना

Crime News: भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

Gold Limit Rules in India: तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? वाचा नियम काय सांगतात

Rice Cooking Tips: कुकरमध्ये मोकळा, सुटसुटीत भात कसा बनवायचा? 5 सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT