Tamil Nadu Bus Accident Saam Tv
देश विदेश

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Satish Kengar

Tamil Nadu Bus Accident:

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथे पर्यटक बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत पडल्याने 3 महिलांसह किमान 8 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांची प्रकृती गंभीर आहे. (Latest Marathi News)

या अपघातात 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस उटीहून कोईम्बतूर जिल्ह्यातील मेट्टुपालयमला जात असताना हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मदत केली जाहीर

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 8 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT