Tamil nadu mp ganesamoorthy  Saam tv
देश विदेश

Shocking News : पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान हार्टअटॅकने मृत्यू

Tamil nadu mp ganesamoorthy : तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. द्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते , खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Vishal Gangurde

Tamil nadu mp death :

तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. द्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते , खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.

पीटीआयच्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. तर त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. खासदार गणेशमूर्ती यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी मंत्री एस मुथुसामी, भाजप आमदार डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम हे रुग्णालयात पोहोचले होते.

का होते नाराज?

तीन वेळा संसदेत निवडून गेलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे भूषवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.

या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली होती.

दरम्यान, पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांतं पार्थिव इरोडच्या पेरियार नगरमधील घरी आणण्यात येईल. त्यानंतर सार्वजिक ठिकाणी श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबात देखील वाद सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT