DMK Minister Arrested By ED Saam Tv News
देश विदेश

DMK Minister Arrested By ED: ईडीने अटक केल्यानंतर ढसाढसा रडू लागले तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री, नेमकं प्रकरण काय?; पाहा VIDEO

Money Laundering Case: छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Priya More

DMK Monister Senthil Balaji: तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी (v senthil balaji) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय म्हजेच ईडीने छापा टाकला. त्यांनंतर ईडीने (ED) त्यांना अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने अटक केल्यानंतर मंत्री सेंथिल बालाजी ढसाढसा रडू लागले. त्यानंतर छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मंगळवारी रात्री उशिरा ईडीने डीएमके सरकारमधील ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत ईडी त्यांच्या घरीच होती. छाप्यानंतर ईडीने मध्यरात्रीच्या सुमारास सेंथिल बालाजी यांना अटक केली. अटक झाल्यानंतर बालाजी यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केली आणि ते रडू लागले. छातीत दुखत असल्याने त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात घेऊन जात असताना मंत्री बालाजी रडत असताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री आजारी असल्याची माहिती मिळताच डीएमकेच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. त्याचसोबत त्यांनी ईडीच्या या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डीएमकेच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, 'बालाजीची अवस्था पाहून असे वाटत होते की ईडीने त्यांना टॉर्चर केले होते.'

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले की, 'आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या हाताळू. घाबरू नका.' त्याचवेळी, डीएमकेचे राज्यसभा खासदार आणि वकील एनआर एलांगो यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडूच्या कायदामंत्र्यांनीही सेंथिल बालाजी यांच्या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सेंथिल बालाजी यांना विनाकारण टार्गेट करुन त्रास दिला जात आहे. ईडी गेल्या 24 तासांपासून त्याची सतत चौकशी करत आहे. हे पूर्णपणे मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

सध्या सेंथिल बालाजी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सेंथिल बालाजी यांची प्रकृती बिघडल्यानंतर डीएमकेच्या सर्व मंत्र्यांची रुग्णालयाबाहेर त्यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत बालाजी यांना अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. ईडी न्यायालयाकडे त्यांच्या कस्टडीची मागणी करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT