Sharad Pawar Threat Update: शरद पवार धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट; कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल

Sharad Pawar Death Threat Update: पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर समजले आहे की, लग्न होत नसल्याने तसेच सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थिनीमुळे सागर बर्वे नैराश्येत आहे.
Sharad Pawar Threat Update
Sharad Pawar Threat UpdateSaam TV
Published On

सचिन गाड

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी एका फेसबुक अकाउंटवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 'तुमचा दाभोळकर करू', अशा शब्दांत शरद पवारांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत या धमकी मागचं डोक्याला विचार करण्यास भाग पाडणारं कारण समोर आलं आहे. (Latest Political News)

धमकी मागचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर बर्वे असे आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर समजले आहे की, लग्न होत नसल्याने तसेच सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे सागर बर्वे नैराश्यात आहे. या नैराश्यातूनच त्याने पवारांना तुमचा दाभोळकर करू अशी धमकी दिली.

Sharad Pawar Threat Update
Akola Crime News: फेसबुकवरील ओळख, नाव बदलून ३२ वर्षीय विवाहितेला फसवलं; पती घरी नसताना यायचा अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात धर्मांतरासह अन्य मुद्दे जास्त प्रमाणात पेटल्याने त्याचा या तरुणावर परिणाम होत आहे. तसेच औरंगजेबाच्या उदात्तीकरणाने देखील आरोपी व्यथित आहे. त्यामुळे पवारांना "तुमचा दाभोलकर करू" अशी धमकी दिली होती.

धमकीसाठी फेक अकाउंट

शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. तपासात ही धमकी सागर बर्वेने दिल्यासा संशय पोलिसांना आहे. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. 'राजकारण महाराष्ट्राचे' या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी (Threat) देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी व्यक्तीचा कोणत्याही राजकीय व्यक्तीशी संबंध नसल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.

Sharad Pawar Threat Update
Nashik Crime News: धक्कादायक! गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाची बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com