TAMIL NADU CM VIJAY FACES TROUBLE saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Tamil Nadu CM Vijay Government Political Crisis: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे. CPI आणि CPM ने पोटनिवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केल्याने TVKच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या खुर्चीवर संकटाचे ढग घोंघावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला त्यांच्याच मित्रपक्षांनी धक्का दिला आहे. राज्यात 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणूकाआधी CPI आणि CPM या डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांची साथ सुटल्याने आता विधानसभेतही TVKच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पोटनिवडणुकीत CPI धारापूरम मतदारसंघातून आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे की, ते TVK च्या नेतृत्वाखालील कोणत्याही निवडणूक आघाडीचा भाग नाहीत. तसेच CPM चे ज्येष्ठ नेते पी.षणमुगम यांच्या व्यक्तव्यामुळेही विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत षणमुगम यांनी म्हटले आहे की, विजय यांच्या सरकारला पूर्ण पाच वर्ष पाठिंबा द्यायचा की नाही ते सरकारची धोरणे, निर्णय आणि लोकांप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल.

बैठकींपासून डाव्या पक्षांनी ठेवले अंतर

याआधी मुख्यमंत्री विजय यांनी आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने 9 सप्टेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली होती. मात्र डाव्या पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. CPM चे षणमुगम यांनी सांगितले की, TVK ला नवी निवडणूक आघाडी तयार करायची असल्याने त्यांच्या पक्षाने या बैठकीला उपस्थित राहणे टाळले. तर CPI ने स्पष्ट केले की, पक्ष बाहेरून विजय सरकारला पाठिंबा देत असला तरी सध्या कोणत्याही निवडणूक आघाडीत सहभागी होणार नाही.

विजय यांच्यावर लेफ्ट पक्ष नाराज का?

विजय यांना भावी पंतप्रधान असा उल्लेख होत असल्याने त्यांच्या मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच विद्यापीठांमधील राजकीय हालचाली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत विजय सरकारने जारी केलेल्या आदेशामुळेही डावे पक्ष नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी TVKकडून एक आदेश जारी करण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलन किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, या आदेशावरून वाद निर्माण झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला. दरम्यान, गुजिलीअम्पराई येथे एका तहसीलदाराकडून कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा डेटा गोळा केला जात असल्याच्या बातम्यांमुळेही वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT