Chennai News
Chennai News Saam Tv
देश विदेश

Chennai News: चेन्नई रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यांसह 3 जणांना अटक

साम टिव्ही ब्युरो

Chennai News:

लोकसभा निवडणुकीआधी चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकावर 4 कोटी रुपयांसह तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये एक भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे. हे लोक चार बॅगमध्ये चार कोटी रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे तिघेही ट्रेनने तिरुनेलवेलीला जात होते. याचदरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींपैकी एक हा भाजपचा कार्यकर्ता आणि एका खासगी हॉटेलचा व्यवस्थापक आहे. त्याच नाव सतीश आहे. त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल पैसे घेऊन जात होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, सतीशने तिरुनेलवेली भाजपचे खासदार उमेदवार नैनार नागेन्टिरन यांच्या सूचनेनुसार रोख घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे. मात्र या प्रकरणाचा संपूर्ण तपास अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल. (Latest Marathi News)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबरम रेल्वे स्थानकावरून 4 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण तपासासाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे. आचारसंहितेच्या निर्बंधांनुसार ही रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त आहे. तमिळनाडूतील सर्व 39 जागांवर एकाच टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करणे ही गंभीर घटना मानली जात आहे.

दरम्यान, तामिळनाडू फ्लाइंग स्क्वॉडला मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर रात्री नऊच्या सुमारास पथकाने रेल्वे स्थानकावर शोधमोहीम सुरू केली. यावेळी रेल्वेतील एक्का सेकंड क्लास एसी कोचजवळ तीन जणांकडून बॅगमध्ये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT